इस्लामपुरात १०० कॉटचे मॉड्युलर रुग्णालय अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:27+5:302021-09-15T04:32:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका इंडियन फोरम व राज्य शासनाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय येथे ...

इस्लामपुरात १०० कॉटचे मॉड्युलर रुग्णालय अंतिम टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका इंडियन फोरम व राज्य शासनाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय येथे १०० कॉटचे मॉड्युलर रुग्णालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी या रुग्णालयाची पाहणी केली.
पाटील यांनी बांधकाम, विविध विभाग, पाणी व वीज व्यवस्था, शौचालय व्यवस्था आदींची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख, कोरोना सेंटरचे प्रमुख डॉ. राणोजी शिंदे, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुभाष पाटील यांनी त्यांना माहिती दिली.
डॉ. देशमुख म्हणाले की, येत्या १० दिवसांत हे कोरोना हॉस्पिटल सुरू होत आहे. शासनाने आवश्यक डॉक्टर, नर्स व कर्मचारी तातडीने द्यावेत. आठ खाटांचा अतिदक्षता विभाग आहे.
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, पीरअली पुणेकर, आयूब हवालदार उपस्थित होते.