जिल्ह्यातील १०० अंगणवाड्या आदर्श होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:18+5:302021-06-09T04:34:18+5:30
सांगली : जिल्हा परिषदेने आदर्श शाळांच्या धर्तीवर आदर्श अंगणवाडी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांची ...

जिल्ह्यातील १०० अंगणवाड्या आदर्श होणार
सांगली : जिल्हा परिषदेने आदर्श शाळांच्या धर्तीवर आदर्श अंगणवाडी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांची निवड केली आहे. मिशन जलजीवन अंतर्गत या अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच वॉशबेसिन बसवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिली.
यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती सुनीता पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीला पाटील उपस्थित होत्या. प्राजक्ता कोरे पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण योजनेतून राबविण्यात येणाऱ्या आदर्श शाळांना लोकसहभागही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी आदर्श शाळांसाठी निधीही जाहीर केला आहे. शाळांचा गुणवत्तावाढीसह विविध उपाययोजना केल्या जात आहेत, आदर्श शाळांच्या धरतीवर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आदर्श अंगणवाडी उपक्रम राबवण्याचा निर्णय महिला बालकल्याण विभागाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील १०० अंगणवाड्यांची निवड केली. मिशन जलजीवन अंतर्गत या अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. वॉशबेसिनही बसविणार आहे.
चौकट
निवड झालेल्या अंगणवाड्या
मिरज तालुका : बुधगाव, कवलापूर, दुधगाव, बामनोली, नांद्रे, माधवनगर, कवठेपिरान, कसबे डिग्रज, आरग, बेडग, भोसे, बेळंकी, कळंबी, मालगाव, एरंडोली व म्हैसाळ.
तासगाव : हातनूर, सावळज, मणेराजुरी, मांजर्डे, अंजनी, येळावी, चिंचणी, बोरगाव, वायफळे.
आटपाडी : आटपाडी क्रमांक एक, दोन, तीन आणि चार, करगणी, खरसुंडी क्रमांक एक व दोन, दिघंची.
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ एक व दोन, देशिंग एक व दोन, ढालगाव एक व दोन, रांजणी आणि आगळगाव.
कडेगाव : चिंचणी वांगी, खेराड वांगी, मोहिते वडगाव, शाळगाव, रायबाग, कडेपूर व नेवरी.
जत : जत क्रमांक एक व दोन, कुंभारी, डफळापूर क्रमांक एक व दोन, उमदी एक व दोन, संख, माडग्याळ, मुचंडी, कोंते बोबलाद एक व दोन, शेगाव.
खानापूर : भाळवणी, खानापूर, रेनावी, लेंगरे, माहुली व करंजे.
शिराळा : मनदुर, चरण, क्रमांक एक व दोन, सागाव, मांगले, शिरसी, कोकरूड, अंत्री बु. क्रमांक एक व दोन.
पलूस : आमनापूर, बांबवडे, भिलवडी, कुंडल, पलूस, रामानंदनगर, वसगडे.
वाळवा : बागणी, कोरेगाव, बोरगाव, भवानीनगर, बावची, येडेमच्छिंद्रगड, चिकुर्डे, कामेरी, कुरळप, नेरले, कासेगाव, वाटेगाव, पेठ आणि येलूर.