कामेरीच्या शेतकऱ्याला १० लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:41+5:302021-03-30T04:17:41+5:30
इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथील ऊसतोडणी वाहतूक दलालास नऊ जोड्या ऊसतोडणी मजूर पुरविण्याचा करार करण्याचा बहाणा करत बीड ...

कामेरीच्या शेतकऱ्याला १० लाखांचा गंडा
इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथील ऊसतोडणी वाहतूक दलालास नऊ जोड्या ऊसतोडणी मजूर पुरविण्याचा करार करण्याचा बहाणा करत बीड जिल्ह्यातील दोघांनी १० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार जून १८ ते जून १९ या कालावधीत घडला.
याबाबत हंबीरराव अंतू पवार (वय ४९, रा. कामेरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पवार हे राजारामबापू कारखान्याकडे ऊसतोडणी आणि वाहतूक करण्याचा ठेका घेतात. त्यासाठी करार करून ऊसतोडणी मजूर घेत असतात. वैजीनाथ रामभाऊ आव्हाड आणि त्यांचा मुलगा बाळू वैजीनाथ आव्हाड (रा. नित्रुड, ता. माजलगाव, जि. बीड) या दोघांनी पवार यांच्याशी १८ ऊसतोडणी मजूर पुरविण्याचा करार केला होता. त्यासाठी या दोघांनी पवार यांच्याकडून १० लाख रुपयांची रक्कम उकळली. त्यानंतर, त्यांना मजूूर न पुरविता पैसे देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे पवार यांनी पोलिसात धाव घेतली. हवालदार दीपक भोसले अधिक तपास करीत आहेत.