कुपवाडमध्ये अज्ञाताकडून १ लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST2021-06-17T04:19:30+5:302021-06-17T04:19:30+5:30

कुपवाड : शहरातील जलाधर अशोक माने (रा. उल्हासनगर) यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील दरवाजाची कडी काढून अज्ञाताने घरात प्रवेश करून ...

1 lakh burglary in Kupwad | कुपवाडमध्ये अज्ञाताकडून १ लाखांची घरफोडी

कुपवाडमध्ये अज्ञाताकडून १ लाखांची घरफोडी

कुपवाड : शहरातील जलाधर अशोक माने (रा. उल्हासनगर) यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील दरवाजाची कडी काढून अज्ञाताने घरात प्रवेश करून घरातील लोखंडी तिजोरीतील १ लाख १ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जलाधर माने हे देशभक्त आर. पी. पाटील हायस्कूलजवळ कुटुंबासह राहतात. मंगळवारी रात्री सर्व जण जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञाताने जिन्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाऊन दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील लोखंडी तिजोरीत ठेवलेले २ तोळे सोन्याचे नेकलेस, २ तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन, अंगठी, चांदीचे पैंजण असा १ लाख १ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत कुपवाड पोलिसात माने यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक तुषार काळेल तपास करीत आहेत.

Web Title: 1 lakh burglary in Kupwad