शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत सराफ दुकानात पोलिस असल्याचे सांगून १ कोटी लुटले, सांगलीतील दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 19:05 IST

एलसीबी-दिल्ली क्राइम ब्रँचची कारवाई

सांगली : दिल्ली येथील फर्शबझार परिसरातील भोला ज्वेलर्समध्ये पोलिस असल्याचे सांगून रोकड, दागिने असा १ कोटी ५६ लाखांचा ऐवज घेऊन पसार झालेल्या सांगली जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दिल्ली क्राइम ब्रँचच्या पथकाने सोनी, आरग (ता. मिरज) येथे अटक केली. संशयित प्रशांत राजकुमार कदम (वय २५, रा. उपळावी रस्ता, सोनी), शुभम राजाराम कांबळे (वय २६, रा. आरग, मूळ रा. कळंबी, ता. मिरज) या दोघांकडून १४०० ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्किटे, तीन किलो चांदी व रोख ११ लाख ९१ हजार रुपये असा एक कोटी ५६ लाख २० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिल्लीतील फर्शबझार पोलिस ठाणे हद्दीतील छोटा बझारमधील भोला ज्वेलर्सचे मालक विक्रम कुबेरदास काबुगडे (रा. फर्शबझार) हे दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास जेवायला बाहेर पडल्यानंतर संशयित प्रशांत कदम व शुभम कांबळे हे पोलिस असल्याचे सांगून घुसले. त्यानंतर चार कामगारांना धमकावून रोख २० लाख रुपये, १४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे, तीन किलो चांदी लुटून एका कामगाराचे अपहण केले. सराफ काबुगडे यांना प्रकार समजताच फर्शबझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेनंतर दिल्ली क्राइम ब्रँचचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तपास करत होते. तेव्हा दुकानातील कामगारांनी प्रशांत कदम व शुभम कांबळे यांच्या मदतीने जबरी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. दोघे पळून सांगली जिल्ह्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगली पोलिसांची मदत मागितली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथक कार्यरत केले. दिल्ली क्राइम ब्रँचचे पथकही दाखल झाले. गुन्हे अन्वेषणचे पोलिस कर्मचारी सुशील मस्के आणि अभिजित माळकर यांना संशयित दोघे सोनी आणि आरग गावात असल्याची माहिती मिळाली.पथकाने सोनी येथे प्रशांत कदम याला तर आरग येथे शुभम कांबळे याला ताब्यात घेतले. दोघांच्या चौकशीत जबरी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून रोख ११ लाख ९१ हजार रुपये, १४०० ग्रॅम सोन्याची बिस्किटे, ३ किलो चांदी असा १ कोटी ५६ लाख २० हजारांचा मुद्देमाल दिल्लीचे उपनिरीक्षक अमित चौधरी, सहायक फौजदार शशिकांत यादव यांनी जप्त केला. त्यानंतर दोघांना चार दिवसांची ‘ट्रान्झिट कोठडी’ घेऊन पोलिस दिल्लीकडे रवाना झाले.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, संदीप पाटील, अतुल माने, श्रीधर बागडी, संकेत कानडे, ऋतुराज होळकर, पवन सदामते, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी, अभिजित पाटील, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

चौघांनी कट रचलादिल्लीतील काबुगडे यांच्या दुकानात चौघे कामगार होते. त्यापैकी दोघांनी सोनी, आरग येथील प्रशांत, शुभम यांच्या मदतीने चोरीचा कट रचला. त्यानुसार दोघेजण पोलिस असल्याचे भासवून दुकानात घुसले होते. जाताना त्यांनी एकाचे अपहरण केले. अखेर त्यांचा प्लॅन फसला.