शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाखांची फसवणूक; शिरोळ तालुक्यातील तिघांसह पाच जणांवर गुन्हा

By घनशाम नवाथे | Updated: April 1, 2024 13:28 IST

सांगली : फर्ममध्ये पैसे गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो, असे सांगून नऊ गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाख ८३ हजारांची फसवणूक ...

सांगली : फर्ममध्ये पैसे गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो, असे सांगून नऊ गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाख ८३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इन्फिनिटी एसयू व्हेंचर एलएलपी फर्मचे उदयकुमार चौगुले (रा. उमळवाड, ता. शिरोळ), सुहास पाटील (रा. टाकवडे, ता. शिरोळ), श्रीकृष्ण कबाडे (रा. बुबनाळ, ता. शिरोळ), शंकर कोरे, अक्षय गौराज (पूर्ण पत्ता नाही) या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रशांत महेश मोहनानी (वय ३८, रा. पत्रकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पाच जणांची इन्फिनिटी एसयू व्हेंचर एलएलपी या नावाची फर्म आहे. या पाच जणांनी फिर्यादी मोहनानी व इतर आठ जणांना फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवले. त्यावर नऊ जणांचा विश्वास बसला.मोहनानी यांच्याकडून एक कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये फर्ममध्ये गुंतवणूक करून घेतले. मोहनानी यांच्या गुंतवणूक रकमेवरील मुद्दल व परतावा मिळून ५० लाख रुपये, १३ लाख २६ हजार रुपये व्याज तसेच आयकर स्वरूपात दिलेला एक लाख ३२ हजार ६०० रुपये टीडीएस, अशी ५१ लाख ३६ हजार ४०० रूपये रक्कम ऑनलाइन घेतली होती.तसेच मोहनानी याची शिल्लक मूळ मुद्दल रक्कम १ कोटी १३ लाख ३८ हजार ६०० रुपये होती. मोहनानी यांची एकूण १ कोटी १३ लाख ३८ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली. तसेच पद्मिनी मोहनानी यांची ३० लाख ८० हजार रुपयांची, मच्छिंद्र मारुती खोत (रा. सिद्धेवाडी) यांची ९ लाख ६० हजार दोनशे रुपयांची, प्रकाश सूर्यकांत तवटे (रा. एरंडोली) यांची ७ लाख ६० हजार रुपयांची, बाजीराव अण्णाप्पा शेलार (रा. सोनी) यांची ११ लाख ८९ हजार ५०० रुपयांची, सिद्धू शिवाजी मलमे (रा. सुभाषनगर) यांची ३ लाख ८७ हजार ५०० रुपयांची, सुहास बबनराव मोहिते (रा. मांजर्डे) यांची ९ लाख ३ हजार रुपयांची, सुधीर संभाजी जाधव (रा. माळवाडी) यांची ५ लाख रुपयांची, चंद्रकांत गंगाराम नंदेश्वर (रा. गव्हर्नमेंट कॉलनी) यांची ५ लाख ७३ हजार २५० रुपयांची फसवणूक केली आहे.

ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हामोहनानी यांनी त्यांच्यासह इतर आठ जणांची १ कोटी ९६ लाख ८३ हजार ५० रुपयांची फसवणूक केल्याबद्दल शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण कायद्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस