शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सिंगल राहणं पसंत करतात 'या' 5 राशींच्या व्यक्ती; यात तुमची रास तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 15:12 IST

नवीन लोकांना भेटणं, डेटिंग करणं, एखाद्या खास व्यक्तीसोबत फिरणं, रॉमॅन्टिक गप्पा मारणं सर्वांनाच आवडतं, असं तुम्हाला वाटतं का?

(Image Credit : Brian Nox)

नवीन लोकांना भेटणं, डेटिंग करणं, एखाद्या खास व्यक्तीसोबत फिरणं, रॉमॅन्टिक गप्पा मारणं सर्वांनाच आवडतं, असं तुम्हाला वाटतं का? जर तुम्हीही असा विचार करत असाल तर, तुम्हाला एक गोष्टी माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे की, आपल्या आजूबाजूला अनेक अशा व्यक्ती आहेत, ज्यांना रिलेशनशिप या फक्त नावानेही नकोसं होतं. एवडचं नाहीतर चुकूनही या व्यक्ती एखाद्याच्या प्रेमात पडलेचं तर त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता  शोधण्यासाठीही मागेपुढे पाहत नाहीत. आता असं करण्यामागे नक्की काय कारण असतं, ते जाणून घेऊया राशीनुसार...

1. धनु रास (Sagittarius)

या यादिमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर येतात धनु राशीची लोकं. या लोकांना खरं तर एखाद्या नात्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु या लोकांना आपलं स्वातंत्र्य जपायला फार आवडतं. एका कमिटेड नात्यामध्ये आल्यानंतर यांच्या स्वातंत्र्यावर थोडेतरी निर्बंध लागतात. जे त्यांना अजिबात मान्य नसतं. त्यामुळे या व्यक्ती कोणसोबतही रिलेशनमध्ये राहण्यासाठी सहजासहजी तयार होत नाहीत. 

2. कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या व्यक्तींना आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला आवडतं. कोणी यांच्यावर कंट्रोल केलेलं, एखादी गोष्ट लादलेली या लोकांना अजिबात आवडत नाही. जर या लोकांचं कोणावर खरं प्रेम जडलं तर नातं पूर्णपणे निभावतात. पण जोपर्यंत त्यांच्या मनाप्रमाणे एखादी व्यक्ती यांना मिळत नाही, तोपर्यंत या व्यक्ती सिंगल राहणचं पसंत करतात. 

3. सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव गंमतीशीर असतो. या व्यक्ती मदत करणाऱ्या आणि इतरांची काळजी घेणाऱ्या असतात. या व्यक्तींमध्ये राग आणि अहंकार फार असतो. परंतु, ज्या व्यक्तीवर यांचा जीव जडतो, त्यांच्यासाठी आपल्या रागावरही नियंत्रण मिळवतात. रिलेशनशिपमध्ये असले तरिही या व्यक्ती इतर कोणापेक्षाही स्वतःची कंपनी एन्जॉय करतात. 

4. मिथुन रास (Gemini)

जर यांच्या कोणी प्रेमात पडलं, स्वतः येऊन यांना प्रपोज केला आणि यांना जर त्या नात्यामध्ये इंटरेस्ट असेल तरच या व्यक्ती एखाद्या नात्याची सुरुवात करतात. पण नात्यामध्ये ते कोणतीही कमिटमेंट करत नाहीत. कारण रिलेशनशिपमध्ये बांधणं आणि पार्टनरच्या अटींनुसार वागणं यांना अजिबात जमत नाही. या व्यक्तींना सर्वकाही आपल्या मनाप्रमाणे घडावं असं सतत वाटत असतं. 

5. मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांमध्ये एका गोष्टीचा फार अहंकार असतो, तो म्हणजे, या व्यक्ती कधीच कोणत्याही व्यक्तीच्या मागे जात नाहीत. याव्यतिरिक्त या लोकांना आपल्या वस्तू, आपले प्लॅन्स, आपली लाइफ म्हणजेच, स्वतःच्या सर्व गोष्टींशी प्रेम असतं. जर इतर कोणामुळेही या गोष्टींमध्ये बदल घडून आला तर यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे या व्यक्ती शक्यतो एकटं राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व