शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

राशीनुसार जाणून घ्या; तुमच्या गर्लफ्रेंडला तुमच्याकडून काय अपेक्षा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 12:16 IST

मुलींना समजून घेणं म्हणजे, जगतील सर्वात कठिण काम. त्यांच्या मनात कधी काय येईल आणि त्या कधी काय विचार करतील याचा काही नेम नसतो, यांसारखी अनेक विधान आपण अनेकदा ऐकतो.

मुलींना समजून घेणं म्हणजे, जगतील सर्वात कठिण काम. त्यांच्या मनात कधी काय येईल आणि त्या कधी काय विचार करतील याचा काही नेम नसतो, यांसारखी अनेक विधान आपण अनेकदा ऐकतो. नात्यामध्येही अनेकदा मुलांना हे समजूण घेणं फार कठिण होतं की, नक्की त्याच्या पार्टनरच्या नात्याकडून अपेक्षा काय आहेत? अनेकदा अशा प्रश्नांमुळे नात्यामध्ये दुरावाही येतो. अशातच असं सांगितलं जातं की, व्यक्तीच्या राशीवरून त्यांच व्यक्तीमत्त्व, आवडी-निवडी यांबाबत जाणून घेणं शक्य होतं. जाणून घेऊया राशीनुसार तुमच्या गर्लफ्रेंडला रिलेशनशिपमध्ये सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते त्याबाबत... 

मेष रास 

मेष राशीच्या मुलींना नात्यामध्ये आपल्या पार्टनरकडून फक्त प्रेमाचीच अपेक्षा असते. पण नात्यामध्ये जास्त मस्ती करणं तुम्हाला कदाचित महागात पडू शकतं. कारण असं समजलं जातं की, या राशीच्या मुली आपल्या नात्याबाबत फार सेन्सिटिव्ह असतात. 

वृषभ रास

असं समजलं जातं की, या राशीच्या मुलींना आपल्या नात्यामध्ये स्पष्टपणा आवडतो. त्यांना कोणत्याही बाबतीत किंतुपरंतु ठेवलेला आवडत नाही. या मुलींची अशी इच्छा असते की, त्यांचा पार्टनर नेहमी त्यांच्याप्रति इमानदार आणि मोकळेपणाने बोलणारा असला पाहिजे. 

मिथुन रास 

मिथुन राशीच्या मुलींना रिलेशनशिप मजा-मस्ती करत आणि मोकळेपणाने एन्जॉय करणं आवडतं. जर त्यांच्या नात्यामध्ये या गोष्टी नसतील तर हे नातं त्या फार काळ निभावू शकत नाहीत, असं समजलं जातं. 

कर्क रास

नवनवीन ठिकाणी फिरणं, हा कर्क राशीच्या लोकांचा सर्वात मोठा विक पॉइंट असतो, असं मानलं जातं. यासोबतच या व्यक्तींना आपल्या नात्यामध्ये रोमान्स, आनंद, शांती आणि सिक्योरिटीचीही गरज असते. त्यामुळे या राशीच्या मुलींना आपल्या नात्यामध्ये जास्तीत जास्त एक्साइटमेंट असणं आवश्यक असतं. 

सिंह रास 

सिंह राशीच्या मुलींना आपला पार्टनर इमानदार असावा असं वाटत असतं. जर या मुलींना आपल्या पार्टनरबाबत कोणताही गोष्ट एखाद्या तिसऱ्या मुलीकडून समजली तर त्यांचा पार्टनरवरचा विश्वास कमी होतो. असं मानलं जातं की, अशावेळी नातं तोडतानाही या मुली मागे-पुढे पाहत नाहीत. 

कन्या रास 

असं मानलं जातं की, या राशीच्या मुलींना प्रत्येक काम खास पद्धतीने करायला आवडतं. या मुलींना आपल्या रिलेशनमध्ये सिक्योरिटी, स्टेबिलिटी आणि नेहमी आनंदी राहण्याची गॅरेटी मिळणं गरजेचं असतं. 

तूळ रास 

रिलेशनशिपमध्ये आपापसातील ताळमेळ आणि सुख-शांती राखणं अत्यंत आवश्यक असतं. असचं काहीस या राशीच्या मुलींचही म्हणणं असतं. तसेच असंदेखील मानलं जातं की, या राशीच्या मुलींना आपल्या पार्टनरच्या तोंडून स्वतःची तारिफ ऐकायला फार आवडतं. 

वृश्चिक रास 

वृश्चिक राशीच्या मुलींना आपल्या पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवायला फार आवडतं. असं मानलं जातं की, या राशीच्या मुली आपल्या नात्यामध्ये इमानदारी आणि पार्टनरची काळजी यांबाबत अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाहीत. 

धनु रास 

एडव्हेंचर्स आणि पॉझिटिव्ह असलेल्या या मुली आपल्या पार्टनरकडूनही या गोष्टींची अपेक्षा करतात. असं मानलं जातं की, या मुलींना कोणत्याही प्रकारचे नियम आणि वचनं यांवर नातं टिकवायला आवडत नाही. 

मकर रास 

या राशीच्या मुली अशा एका पार्टनरच्या शोधात असतात की, ज्यामध्ये पेशंस खूप असतील. एवढचं नाही तर यांच्या आनंदासाठी काहीही करायला तयार होणारा पार्टनर या मुलींना फार आवडतो. असं मानलं जातं की, या मुली प्रत्येक गोष्ट परफेक्ट प्लॅनिंगनुसार करतात. मग ते एखादं नातं असलं तरिही त्या परफेक्ट प्लॅनिंग करतात. 

कुंभ रास 

या राशीच्या मुलींना रिलेशनमध्ये एनर्जी आणि स्वातंत्र्याची गरज असते. त्याचबरोबर या मुलींना अशी अपेक्षा असते की, त्यांचा पार्टनर डाउन टू अर्थ असावा. पार्टनरचा राग आणि यांना सतत अपमानित करणं या अजिबात सहन करू शकत नाहीत. 

मीन रास 

मीन राशीच्या मुलींना समजून घेणारा आणि तेवढचं स्वातंत्र्य देणारा पार्टनर पाहिजे असतो. स्वतंत्रपणे जगणाऱ्या या राशीच्या मुलींना कोणतीही बंधन अजिबात आवडत नाहीत. तसेच पार्टनर नात्यामध्ये लॉयल असावा अशीही त्यांची अपेक्षा असते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व