शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमुळे पडलाय का तुमच्या वागण्यात बदल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 16:02 IST

कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाचं टेन्शन जास्त असतं. पण कामाचं हे टेन्शन नेहमीसाठी तणाव देणारं असेल तर चिंतेची बाब होऊ शकते. याचा थेट प्रभाव तुमच्या व्यवहारावर पडतो.

(Image Credit : www.huffingtonpost.com)

कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाचं टेन्शन जास्त असतं. पण कामाचं हे टेन्शन नेहमीसाठी तणाव देणारं असेल तर चिंतेची बाब होऊ शकते. याचा थेट प्रभाव तुमच्या व्यवहारावर पडतो. जर तुम्ही आता निगेटीव्ह विचार करत असाल आणि मित्र तुमच्या या बदलत्या व्यवहाराची तक्रार करत असतील तर वेळीच सावध व्हा. ऑफिसमधील कामाचा स्ट्रेस कसा ओळखाल आणि त्यावर काय उपाय कराल हे जाणून घेऊया...

ब्रेक घेणं बंद केलंय 

जर तुम्ही कामादरम्यान छोटे छोटे खासकरुन लंच ब्रेक घेणेही बंद केले असेल तर, समजा की ऑफिसचं काम तुमच्यावर भारी पडत आहे. जर लंचऐवजी तुम्ही डेस्कवर स्नॅक्स खाऊन काम चालवत असाल तर समजा की तुम्ही स्ट्रेसचे शिकार झाले आहात. 

गोष्टी विसरणे

कधी कधी काही विसरणं समजलं जाऊ शकतं. पण नेहमीच तुम्ही काहीना काही विसरत असाल तर ही धोक्याची घंटा आहे. तुम्ही तुमची महत्त्वाची कामे जसे की, रिपोर्ट सबमिट करणे, घरातून निघताना मोबाइल घरी विसरणे अशा अनेक गोष्टी विसरत असाल तर तुम्हाला काही दिवसांच्या सुट्टीची गरज आहे. कारण हे स्ट्रेसचं लक्षण आहे. 

नकारात्मक विचार

लाइफस्टाइलसोबतच तुमचे विचारही बदलत आहेत. जर तुम्हाला तुमच्या क्षमतांवर शंका येत असेल आणि काही कठीण निर्णय घेताना तुम्हाला अक्षम वाटत असेल, जबाबदाऱ्यांपासून दूर पळत असाल, तुम्हाला मोटिव्हेशनल काहीच वाटत नसेल तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात असे समजा. अशावेळी तुम्ही मेडिटेशनचा आधार घेऊ शकता. 

स्वत:ची चिंता नाही

जर आता ऑफिसला जाताना नीट तयार होत नसाल, आपल्या आरोग्याची काळजी घेत नसाल याचा अर्थ ऑफिसमधील प्रेशर तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकत आहे. तुम्हाला वेळीच यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधायला हवा. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपHealthआरोग्य