शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परफेक्ट जोडीदार ठरतात या 5 राशींच्या महिला; मनापासून निभावतात नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 13:04 IST

'लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, फक्त योग्य वेळी ती दोघंजण एकमेकांना भेटतात आणि लग्नगाठ बांधून एकमेकांसोबत राहण्याचं वचन देतात'.

'लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, फक्त योग्य वेळी ती दोघंजण एकमेकांना भेटतात आणि लग्नगाठ बांधून एकमेकांसोबत राहण्याचं वचन देतात'. अशा अनेक गोष्टी आपल्याला नेहमीच थोरामोठ्यांकडून ऐकायला मिळत असतात. आपल्यापैकी अनेक लोकांचा या गोष्टींवर विश्वासही असतो. परंतु आपल्या जन्मापासून जोडल्या गेलेल्या राशींची मदत घेतली तर आपल्या मनाप्रमाणे आणि उत्तम जोडीदार मिळण्यासाठी मदत होते. जर तुम्हीही तुमच्यासाठी परफेक्ट जोडीदाराच्या शोधात असाल तर आज काही राशींनुसार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कोणत्या राशीच्या महिला उत्तम जोडीदार ठरू शकतात. 

1. कर्क रास

कर्क राशीच्या महिला अत्यंत काळजी घेणाऱ्या असतात. तसेच आपल्या जोडीदारासोबत त्या प्रामाणिक असतात, असं मानलं जातं. या थोड्याशा इमोशनल स्वभावाच्या असून त्या आपल्या नात्यासाठी काहीही करायला तयार होतात. नात्यामध्ये त्या स्वतःच्याही आधी पार्टनरबाबत विचार करत असतात. आपल्या पतीचा विचार करून त्याला काय हवं, नको ते पाहण्यासोबतच त्यांच्या मनाचाही विचार करतात. 

2.  मीन रास

मीन राशीच्या मुलींवर कोणत्याही नात्याबाबत तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. जर ती तुमच्यावर खरचं प्रेम करत असेल तर कधी तुम्हाला फसवण्याचा किंवा सोडून जाण्याचा विचारही तिच्या मनात येणार नाही. अशा मुलींसाठी त्यांच्या जोडीदारामध्येच त्यांचं जग असतं, असं मानलं जातं. विश्वासू असण्यासोबतच त्या समजदारही असतात. त्यामुळे तुटणारं नातं कसं सावरावं हे त्यांना व्यवस्थित येतं. परंतु चुकूनही यांच्यासोबत विश्वासघात करण्याचा विचार करू नका. कारण त्यांना त्याचा बदला घेणंही उत्तमरित्या जमतं. 

3. तुळ रास

तुळ राशीच्या महिला अत्यंत नम्र आणि संवेदनशील स्वभावाच्या असतात. आपला जोडीदार आनंदी राहवा यासाठी, त्या सतत प्रयत्नशील असतात. त्या स्वतःही खुश राहतात आणि पार्टनरलाही खुश ठेवतात. कोणत्याही निर्णयात त्या आपल्या जोडीदाराच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहतात. जर तुम्ही तुमच्या एखाद्या कामातही त्यांची मदत मागितली तर त्या तुम्हाला अजिबात नकार देणार नाहीत. 

4. वृषभ रास

वृषभ राशीच्या मुलींच्या लाइफ लिस्टमध्ये सर्वप्रथम त्यांचा जोडीदार असतो. या इतर कोणत्याही नात्यापेक्षा किंवा गोष्टीपेक्षा आपल्या नात्याला अधिक महत्त्व देतात. फक्त प्रेमानेच नाही तर आपल्या समजुतदारपणाने त्या आपलं नातं निभावतात. आपल्या जोडीदारासोबत त्या नेहमी प्रामाणिक असतात, असं मानलं जातं. फक्त जोडीदारच नाही तर त्याचं कुटुंब आणि त्याच्या आयुष्यातील इतर महत्त्वाच्या व्यक्तींचीही या मुली काळजी घेतात. तसेच या आपल्या मुलांचीही व्यवस्थित काळजी घेतात. 

5.  कुंभ रास

कुंभ राशीच्या मुली फार उत्साही असून त्या आपल्या जोडीदारालाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्या सतत आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी सतत एक्सपरिमेंट करत असतात. त्यामुळे त्यांचा जोडीदारही त्यांची ही मेहनत पाहून नेहमीच खुश राहतात. गोष्ट नातं आणि भावनांची असेल तर त्या नेहमी आपल्या जोडीदारासोबत असतात. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप