VIDEO : अंध विद्यार्थीनींचे रॅम्प वॉक प्रेरणादायी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 16:27 IST
भूवनेश्वर शहरात आयोजित अंध विद्यार्थ्यांसाठी एका विशेष फॅशन शोच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केलेले रॅम्प वॉक इतरांसाठी प्रेरणादायी ठरले.
VIDEO : अंध विद्यार्थीनींचे रॅम्प वॉक प्रेरणादायी !
भूवनेश्वर शहरात अंध विद्यार्थ्यांसाठी आयोजित एका विशेष फॅशन शोच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केलेले रॅम्प वॉक इतरांसाठी प्रेरणादायी ठरले. या रॅम्प वॉकमध्ये १८ ते ३० वयातील १४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईन्ड म्हणजेच नॅबने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जमुरी बिस्वाल ही मिस ओडिशा हा किताब जिंकला. स्नेहप्रभा लेन्का हिला मिस प्रिन्स किताब मिळाला. संध्याराणी प्रताप हिचा या स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. १५ दिवसांचे प्रशिक्षण दिल्यानंतर स्पर्धेत विजयी ठरलेल्या चारही जणांना मुंबईत मिस इंडिया स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे.