शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Valentine's Day : व्हॅलेंटाइन डे कधीपासून आणि का साजरा केला जातो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 10:03 IST

मुळात जर तुम्ही व्हॅलेंटाइन डे साजरा करता तर तुम्हाला त्याबाबत माहिती असली पाहिजे. म्हणजे कधीपासून हा दिवस साजरा केला जातो? कशी ही प्रथा सुरू झाली?

(Image Credit : postermywall.com)

अखेर ज्या दिवसाची तरूण मंडळी आतुरतेने वाट बघतात तो व्हॅलेंटाइन डे उजाडला. आज म्हणजेच १४ फेब्रुवारीला कपल्स मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेम दिवस साजरा करतात. हा दिवस जगभरात साजरा केला जातो. कारण त्याला तसं ऐतिहासिक महत्व देखील आहे. आजही अनेक कपल्स हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात, पण हा दिवस साजरा करण्याची प्रथा कधी, कशी सुरू झाली हे अनेकांना माहीत नसतं. 

मुळात जर तुम्ही व्हॅलेंटाइन डे साजरा करता तर तुम्हाला त्याबाबत माहिती असली पाहिजे. म्हणजे कधीपासून हा दिवस साजरा केला जातो? कशी ही प्रथा सुरू झाली? का याची गरज निर्माण झाली? इत्यादी इत्यादी. तर आज आम्ही तुम्हाला या व्हॅलेंटाइन डेबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत.

प्रेमाला विरोध करणारा राजा

रोममध्ये तीसऱ्या शतकातील क्लॉडियस या क्रूर राजाने प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांवर अनेक बंधनं लादली, त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. क्लॉडियस राजाचं असं मत होतं की, अविवाहित पुरूष हे विवाहित पुरूषांच्या तुलनेत अधिक चांगले होऊ शकतात. त्यामुळे त्याने सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचा आदेश दिला होता. संत व्हॅलेंटाइन यांनी राजाच्या या आदेशाला कडाडून विरोध केला होता. त्यांनी अनेक सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची लग्न लावून दिली होती. 

संत व्हॅलेंटाइन

संत व्हॅलेंटाइन हे धर्मगुरू होते. त्यांनी प्रेमाचा प्रसार आणि प्रचार केला. पण राजाच्या आदेशाला धुडकावल्यामुळे  राजाने त्यांना २६९ सालातील १४ फेब्रुवारीच्याच दिवशी फाशीची शिक्षा दिली. तेव्हापासून आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीला व्हॅलेंटाइन म्हणण्यास सुरूवात झाली. संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या या संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो. 

व्हॅलेंटाइन डे ची सुरूवात

(Image Credit : nytimes.com)

हा दिवस साजरा करण्याची प्रथा एका रोमन उत्सवापासून झाली. त्या काळात एक ‘Lupercalia’ नावाचा एक उत्सव साजरा केला जात होता. या उत्सवात तरूण एका बॉक्समधून तरूणीच्या नावाची चिठ्ठी काढत होते. उत्सवादरम्यान दोघेही कपल बनत होते आणि काही कपल्स लग्नही करत होते. नंतर येथील चर्चमध्ये हा उत्सव ख्रिश्चन उत्सव म्हणून आणि व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत साजरा होऊ लागला. त्यानंतर लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संत व्हॅलेंटाइन यांचं नाव वापरू लागले.

सोशल मीडियातही प्रेमाचा पाऊस

(Image Credit : frenchtoday.com)

गेल्या अनेक वर्षांपासून 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया आणि संपर्क करण्याच्या माध्यमांमध्ये वाढ झाल्याने या दिवसाच्या लोकप्रियतेतही वाढ झाली असून जगभरात हा दिवस साजरा करणाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. प्रेमीयुगल, प्रेम व्यक्त करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती यादिवशी फूल, चॉकलेट आणि गिफ्ट्स देऊन आपलं प्रेम मात्र व्यक्त करतातच. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेRelationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप