शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात 'या' गावातील लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 19:28 IST

सध्या भारतामध्ये लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा ट्रेन्ड आहे. यामागे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. पण झारखंडच्या गुमला जिल्ह्यामध्ये लोक नाइलाजास्तव लिव्ह इनमध्ये राहतात.

सध्या भारतामध्ये लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा ट्रेन्ड आहे. यामागे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. पण झारखंडच्या गुमला जिल्ह्यामध्ये लोक नाइलाजास्तव लिव्ह इनमध्ये राहतात. ऐकून थोडासा गोंधळ उडाला असेल ना? नाइलाजाने कोण लिव्ह इनमध्ये राहत असेल? यामागे कारणही तसंच आहे. या जोडप्यांकडे लग्नामध्ये जेवण देण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे ही जोडपी लग्न न करता लिव्ह इनमध्येच राहण्याचा मार्ग स्वीकारतात. गुमला जिल्ह्यातील चरकटनगर गावामध्ये राजू महली आणि मनकी देवी गेल्या 20 वर्षांपासून एकत्र राहत होते. परंतु आपल्या मर्जीने नाही. गरिबीमुळे ते लग्नाचं जेवणं देऊ शकत नव्हते जे त्यांच्या समाजात लग्नाला मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असते. सोमवारी अशा अनेक जोडप्यांच्या नात्याला समाजात मान्यता मिळावी म्हणून एका एनजीओने एका सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यामध्ये राजू आणि मनकीप्रमाणे 132 जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आले. लग्न परंपरेप्रमाणे त्यांचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. त्याचे असे झाले की, झारखंडमधील ओरांव, मुंडा आणि आदिवासी जमातीमध्ये लिव्ह इनमध्ये राहणं एक सामान्य बाब आहे. कारण या समुदायातील लोकांची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची असते. तसेच लग्न समारंभ आणि त्यामध्ये देण्यात येणाऱ्या जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. 

समाजाची परवानगी असणं अत्यंत आवश्यक

स्थानिक बोलीभाषेत त्यांना धकुआ म्हटलं जातं. या प्रथेमध्ये महिलेला आपल्या पार्टनरसोबत एकत्र राहण्यासाठी समाजाकडून परवानगी घेणं आवश्यक असतं. परंतु त्या नात्यामध्ये त्या महिलेला पत्नी न संबोधता धकुआ असं म्हटलं जातं. ज्याचा अर्थ म्हणजे, लग्न न करता एखाद्या पुरुषाच्या घरात राहणं. सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याऱ्या एनजीओने उचललेलं हे पाऊल ही प्रथा दूर करण्यासाठी असल्याचे सांगितले. राजू महली यांनी सांगितले की, 'मी जमिनीच्या एका छोट्या भागात शेती करून माझे पोट भरतो. परंतु माझ्याकडे लग्न करण्याएवढे पैसे नाहीत. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. जेव्हा एनजीओने आम्हाला सामूहिक विवाह सोहळ्याच्या कल्पनेबाबत सांगितले तेव्हा आम्ही लगेच तयारी दर्शवली. 

लग्नामध्ये प्रत्येक जोडप्याला 10 पाहुण्यांना घेऊन येण्याची परवानगी

निमित्त एनजीओच्या सचिवांनी सांगितले की, धकुआ महिला पत्नीप्रमाणेच कुटुंबाचा हिस्सा असतात. परंतु त्यांना आणि त्यांच्या मुलांना कोणतेही अधिकार नसतात. आम्ही 2016मध्ये अशा 21 आणि 2017मध्ये 43 जोडप्यांचं लग्न लावून दिल होतं. यावर्षी या संख्येत वाढ झाली असून 132 जोडप्यांची लग्न लावून दिली आहेत.

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपIndiaभारतcultureसांस्कृतिक