२०२० मध्ये नात्यात गोडवा टिकवायचा असेल तर करू नका 'या' चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:51 AM2020-01-02T10:51:09+5:302020-01-02T10:56:08+5:30

नवीन वर्षाची सुरूवात नुकतीच झाली आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी संकल्प केला असेल.

Tips for happy relationship in 2020 | २०२० मध्ये नात्यात गोडवा टिकवायचा असेल तर करू नका 'या' चुका

२०२० मध्ये नात्यात गोडवा टिकवायचा असेल तर करू नका 'या' चुका

Next

नवीन वर्षाची सुरूवात नुकतीच झाली आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी संकल्प केला असेल. तर काही लोकांनी आपल्या पार्टनरला प्रॉमिस केलं असेल. आयुष्य जगत असताना अनेक लहान मोठ्या कुरबूरी होत असतात. पण काहीवेळा जोरदार भांडण होऊन तुमचा पार्टनर तुमच्यापासून खूप लांब जाण्याची शक्यता असते. तसंच त्यामुळे आपल्या मानसीक स्थीतीवर परिणाम होत असतो. कारण पार्टनरशी भांडण झालं तर कोणत्याच कामात मनं लागत नाही.  कारण आपलं लक्ष पार्टनरचा राग कसा घालवता येईल याकडे असतं.


काहीवेळा अहंकाराची भावना ठेवल्यामुळे  नातं तुटू सुद्धा शकतं. जर तुम्हाला ही परीस्थिती टाळायची असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं. आज तुम्हाला अशा काही टीप्स शेअर करणार आहोत. ज्यांचा वापर तुम्ही केलात तर पार्टनरशी होणारं भांडण तुम्ही टाळू शकता. यामुळे तुमचं संपूर्ण वर्ष आनंदाचं आणि प्रेमाने भरलेलं जाईल.

जबरदस्ती करू नका

जर तुम्हाला तुमचं नातं चांगल्याप्रकारे टिकवायचं असेल तर आपल्या पार्टनरला कधीही कोणत्या गोष्टीसाठी जबरदस्ती करू नका. कारण जर तुम्ही जर एकमेंकांची मनं जपाल तर  तुमच्यात भांडण होणार नाहीत. तसंच नातं अधिकाधिक घट्ट होत जाईल. जर तुम्ही पार्टनरला आपली स्पेस दिली नाही तर त्या गोष्टीमुळे पार्टनरला अनसेफ वाटण्याची शक्यता असते. त्यातून दुरावा वाढू शकतो.

प्रश्न विचारताना कंट्रोल ठेवा

जेव्हाही तुम्ही पार्टनरशी बोलत असता त्यावेळी  आज घरी काय केलं,  काय करत आहेस, ऑफिसमध्ये काय झालं, किती वाजता जेवलीस अश्या टाईपचे प्रश्न असतात.  पण असं विचारत असताना पार्टनरला इरीटेट होईपर्यंत प्रश्न विचारू नका. प्रश्न विचारताना मर्यादा ठेवा. नाहीतर  नात्यांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते. 

अती काळजी  करू नका

 तुम्हाला तुमच्या पार्टनरची काळजी वाटतं असली तरी  जास्त काळजी करून प्रश्न विचारणं योग्य नाही. यामुळे तुमचा पार्टनर तुमच्यावर वैतागून रागवण्याची शक्यता असते.  तसंच चुक झाली असल्याल सॉरी बोलण्यासाठी विचार करू नका. चुक झाल्यास आधी पार्टनरची माफी मागा. 

Web Title: Tips for happy relationship in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.