शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

मुलींनो जरा सांभाळून... 'या' 5 राशींची मुलं खोटं बोलण्यात असतात माहिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:43 IST

आपल्या बायकोची भिती जवळपास सर्वच पुरूषांना वाटते, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. कदाचित याच भितीमुळे अनेक पुरूष आपल्या बायकोपासून अनेक गोष्टी लपवतात किंवा खोटं बोलतात.

आपल्या बायकोची भिती जवळपास सर्वच पुरूषांना वाटते, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. कदाचित याच भितीमुळे अनेक पुरूष आपल्या बायकोपासून अनेक गोष्टी लपवतात किंवा खोटं बोलतात. पण प्रत्येकवेळी गरजेचं नाही की, एखादी चुकीची गोष्ट लपवण्यासाठी खोटं बोलत असतील. अनेकदा आपल्या बायकोला वाईट वाटू नये म्हणूनही अनेक पुरूष खोटं बोलतात. आपल्या राशींवरून अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. जाणून घेऊया अशाच काही राशींबाबत... ज्या खोटं बोलण्यामध्ये माहिर असतात. पण अनेदा दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी खोटं बोलतात. 

मिथुन राशी 

मिथुन राशीच्या व्यक्तींचा प्रत्येक गोष्टीबाबत वेगळा दृष्टिकोन असतो. मग ती गोष्ट रिलेशनशिपबाबत असली तरिही ते त्याकडे वेगळ्या नजरेतून पाहतात. असं सांगितलं जातं की, जे दुसऱ्यांसाठी खोटं असतं. त्यांना अनेकदा ती गोष्ट खरी वाटते. अनेकदा या कारणांवरून त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. 

कुंभ राशी 

कुंभ राशीच्या व्यक्ती फार मतलबी स्वभावाच्या असतात. असं सांगितलं जातं की, आपल्या पार्टनरने आपलं सर्व ऐकावं असं सतत या व्यक्तींना वाटत असतं.  पार्टनरकडून आपलं काम काढून घेण्यासाठी त्या नेहमी खोट्याचा आधार घेतात. एवढचं नाही आपलं काम पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या विश्वात पुन्हा रममाण होतात.

कर्क राशी  

कर्क राशीच्या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट फिरवून सांगण्याची सवय असते. रहस्यमयी असणाऱ्या या व्यक्ती कोणालाही आपल्याबाबतच्या सर्व गोष्टी सांगत नाहीत. तसेच या आपलं गुपित लपवण्यासाठी पार्टनरसोबत खोटंही बोलतात. 

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्ती खोटं बोलण्यापासून तसे दूर राहतात आणि सत्याच्या कसोटीवर उतरण्यास नेहमी तयार असतात. परंतु, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला संकटातून बाहेर काढण्यासाठी या व्यक्ती खोट्याचा आधार घेतात. असं म्हटलं जातं की, या लोकांना खोटं बोलायला आवडत नाही पण दुसऱ्यांच्या आनंदासाठी हे खोटं बोलण्याची रिस्क घेतात. 

वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने फार इमानदार असतात आणि खोटं बोलण्यापासून जेवढं शक्य असेल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा काही गोष्टींमध्ये किंवा पार्टनरच्या भल्यासाठी खोट्याचा आधार घेतात. पण या व्यक्ती खोटं बोलत आहेत, हे सहजासहजी दुसरं कोणाला समजत नाही. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व