शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचा निर्णय घेण्यासाठी लोक किती दिवसांचा वेळ घेतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 16:15 IST

नुकतंच निक जोनास आणि प्रियांका चोप्रा या बहुचर्चीत जोडप्याचा शाही विवाह पार पडला. पण अजूनही त्यांच्या चाहत्यांना एका प्रश्नाने छळलं आहे.

नुकतंच निक जोनास आणि प्रियांका चोप्रा या बहुचर्चीत जोडप्याचा शाही विवाह पार पडला. पण अजूनही त्यांच्या चाहत्यांना एका प्रश्नाने छळलं आहे. तो म्हणजे केवळ सहा महिने डेटिंग करुन या दोघांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला? यावर निक जोनासला विचारलं गेलं तर त्याने सांगितलं की, 'आमच्या दोघांच्याही आई-वडिलांनी लवकर लग्न केलं होतं. जेव्हा तुम्हाला कळतं की ही योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती आहे. तेव्हा तुम्हाला आपोआप जाणवतं'.

लग्न करण्याचा निर्णय घेणं ही कुणासाठीही वेळखाऊ आणि गंभीर प्रोसेस आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातूनही हे समोर आलं आहे. यातून समोर आलं आहे की, एखादी व्यक्ती लग्नासाठी योग्य आहे अथवा नाही, याचा निर्णय घेण्यासाठी लोक साधारण सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ घेतात.  

हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील २ हजार रिलेशनशिपमध्ये असलेल्या आणि नसलेल्या लोकांना काही प्रश्न विचारले. त्यांना विचारण्यात आलं होतं की, ते किती दिवस आणि किती डेटनंतर हे ठरवतात किंवा ठरवतील की त्यांना समोरची व्यक्ती आवडते आणि हे नातं पुढे जाऊ शकतं. 

यातून अभ्यासकांना हे आढळलं की, रिलेशनशिपमध्ये असणारे लोक हे सरासरी १७२ दिवस हे ठरवण्यासाठी वेळ घेतात की, त्यांना पार्टनरसोबत लग्न करायचं आहे की नाही. तर सिंगल असणारे लोक हाच निर्णय घेण्यासाठी साधारण २१० दिवस वेळ घेतात. 

तज्ज्ञ याबाबत त्यांचं मत सांगतात की, हनीमूनचा मडू हा साधारण ३ महिने कायम असतो आणि त्यानंतर लोक आपलं खरं रुप दाखवायला लागतात. यानंतरच दोघांनाही एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयी माहीत व्हायला लागतात. तज्ज्ञांनी हेही सांगितलं की, असा काही आयुष्य बदलवणारा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या आतून येणाऱ्या भावना ओळखता यायला हव्यात. 

या अभ्यासात सहभागी काही लोकांनी सांगितले की, पाच वाईट इंटरॅक्शननंतर ते कुणी आवडलं की नाही याचा निर्णय घेतात. पण रिसर्च सांगतो की, यासाठी पाच नाही तर केवळ ३ वाईट इंटरॅक्शनच फार आहेत.  

टॅग्स :marriageलग्नrelationshipरिलेशनशिप