सेल्फी व मेकअपसाठी आता ‘स्मार्ट आरसा’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 15:45 IST
सर्वच क्षेत्रात स्मार्टनेस येत असून, त्या माध्यमातून विविध उपकरणे स्मार्ट होत असताना दिसत आहेत. एका कंपनीने महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘मेकअप’ची दखल घेत खास प्रणालीयुक्त ‘’जुनो’ नावाचा ‘स्मार्ट मिरर’ सादर करण्याची घोषणा केली आहे.
सेल्फी व मेकअपसाठी आता ‘स्मार्ट आरसा’ !
सर्वच क्षेत्रात स्मार्टनेस येत असून, त्या माध्यमातून विविध उपकरणे स्मार्ट होत असताना दिसत आहेत. एका कंपनीने महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘मेकअप’ची दखल घेत खास प्रणालीयुक्त ‘’जुनो’ नावाचा ‘स्मार्ट मिरर’ सादर करण्याची घोषणा केली आहे. या स्मार्ट मिररने आकर्षक सेल्फीदेखील काढण्यात येणार आहे. बहुतेक महिलांना मेकअप करताना विशेष लाईट सिस्टीमची आवश्यक असते. नेमकी हीच बाब लक्षात घेत ‘जुनो’ या नावाने एक स्मार्ट आरसा विकसित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात तीन विविध प्रकारे मेकअपसाठी आवश्यक असणारा प्रकाश पुरविण्यात येतो. याच्या साह्याने महिला मेकअप करू शकतात. याच माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाचा सेल्फी काढण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. यासाठी त्या आरशाला ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीच्या सहाय्याने स्मार्टफोन अटॅच करता येतो. याच्या मदतीने सेल्फी काढण्यासह त्या स्मार्ट मिररचे विविध फंक्शन्सचे नियंत्रणही करता येते. या आरशाच्या काचावर तीन बटन्स देण्यात आले आहेत. यातील मेकअपच्या बटनावर क्लिक करून कुणीही मेकअपचा लाईट आॅफिस, इनडोअर आणि इव्हिनिंग या तीन मोडपैकी आपल्याला हव्या त्या पध्दतीने सेट करू शकतो. दुसऱ्या बटनच्या मदतीने सेल्फीसाठी लाईट अॅडजस्ट करता येतो. तर तिसऱ्याच्या मदतीने कुणीही या आरशाला एखाद्या ‘टेबल लँप’प्रमाणेही वापरू शकतात. तसेच यात मेकअपच्या वस्तूंच्या स्टोअरेजसाठी ‘ट्रे’ म्हणून वापरण्यासाठी जागाही देण्यात आली आहे. अर्थात हा स्मार्ट मिरर ‘फोर इन’या पध्दतीने काम करतो. ‘जुनो’ हा मिरर ‘किकस्टार्टर’ या क्राऊडफंडिंग करणाऱ्या साईटवर पहिल्यांदा सादर करण्यात आला असून, येत्या काही महिन्यांमध्ये त्याला जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात येणार आहे.