शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तो तुम्हाला पसंत करतो कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 11:49 IST

मुलं आपल्या वेगवेगळ्या वागण्यातून हे दर्शवत असतात की, ते तुमच्यासाठी दिवाने आहेत. असेच काही संकेत खालीलप्रमाणे बघता येतील.

मुंबई : काही मुलं हे आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करण्यासाठी थोडे घाबरतात. पण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असे की, तो तुम्हाला पसंत करतो किंवा त्याच्या मनात तुमच्याविषयी काय आहे तर त्याच्या बॉडी लॅंग्वेजकडे लक्ष द्या. मुलं आपल्या काही वागण्यातून हे दर्शवत असतात की, ते तुमच्यासाठी दिवाने आहेत. असेच काही संकेत खालीलप्रमाणे बघता येतील.

बहाण्याचे जवळ येणे

त्याचं तुमच्यावर प्रेम आहे हे भलेही ते सांगण्यासाठी घाबरत असतील. पण छोट्या छोट्या गोष्टींमधून ते त्यांच्या मनातील तुमच्याविषयीचं प्रेम जाहीर करत असतात. ते बहाण्याने तुमच्या जवळ येत असतात, तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतात, अचानक हात पकडत असतील तर समजून घ्या त्याच्या मनात तुमच्याविषयी नक्कीच काहीतरी आहे. 

(पहिल्या भेटीत मुलांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात मुली!)

बोलताना तुमच्या डोळ्यात बघत असेल

माणूस कितीही खोटं बोलला तरी त्याचे डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. त्यामुळे तो जर तुमच्याशी बोलताना तुमच्या डोळ्यात बघत असेल, तुम्ही त्याच्याकडे बघितल्यावर नजर दुसरीकडे करत असेल तर नक्कीच त्याच्या मनात काहीतरी सुरु आहे असं समजा. 

तुमच्या सुंदरतेला दाद देत असेल

तो तुम्ही सोबत असताना किंवा सोबत नसताना नेहमी तुमच्या दिसण्याचं, डोळ्यांच, बोलण्याचं, स्वभावाचं कौतुक करत असेल तर समजून घ्या की, त्याच्या मनात तुमच्याबद्दल नक्कीच काहीतरी आहे. 

(पार्टनरसोबतची भांडणं टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी)

तुम्हाला सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असेल

तुम्ही नाराज किंवा दु:खी असाल तर तुमचा मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींतून हसवण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्याचं तुमच्यावर प्रेम असू शकतं. कारण असं प्रत्येकाला वाटत नसतं. जे खास असतात त्यांना हे जाणवतं. 

तुम्हाला थेट-चोरुन बघणं

जर तुम्ही दोघे बोलत असाल आणि तो तुमच्याकडे टक लावून बघत असेल किंवा तुम्हाला चोरुन चोरुन बघत असेल तर नक्कीच तुम्ही त्याला आवडताय असं असू शकतं.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट