पहिल्या भेटीत मुलांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात मुली!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 05:16 PM2018-04-30T17:16:32+5:302018-04-30T17:16:32+5:30

पहिल्या भेटीत मुली काय नोटीस करतात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. चला जाणून घेऊया मुली कोणत्या गोष्टी नोटीस करतात. 

Things women notice about men in first meeting | पहिल्या भेटीत मुलांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात मुली!

पहिल्या भेटीत मुलांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात मुली!

Next

असे म्हणतात की, लोक पहिली भेट कधीच विसरत नसतात. तुमची पहिली भेट तुमच्या नात्याला नवीन दिशा देणारी ठरते. अशात तुम्ही जर एखाद्या मुलीला भेटणार असाल तर ती भेट अधिकच स्पेशल असते. त्यामुळे पहिल्या भेटीत मुली काय नोटीस करतात, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. चला जाणून घेऊया मुली कोणत्या गोष्टी नोटीस करतात. 

1) शारीरिक मापदंड

अर्थातच मुलीचं सर्वातआधी लक्ष तुमच्या शरीरयष्टीवर जातं. खूप जास्त उंची असलेले किंवा कमी उंची असलेले मुले  मुलींना फार आवडत नाहीत. भारतात 5.4 ते 6.2 फूट उंची सामान्य मानली जाते.

2) तुमचं दिसणं

शरीरयष्टीनंतर मुली लक्ष देतात ते तुमच्या दिसण्यावर, तुमच्या चेह-यावर. प्रत्येक मुलीची आवड वेगळी असते त्यामुळे कुणाला तुम्ही आवडाल तर कुणाला नाही. पण दाढी-केस नीट करुन गेलात तर बरं होईल.

3) तुमचं हसणं 

पहिल्या भेटीत तुम्हा दोघांचही थोडं लाजणं सामान्य बाब आहे. पहिल्या भेटीत प्रत्येकालाच एकमेकांचा हसरा चेहरा बघायचा असतो. त्यामुळे मुली सुद्धा तुमचं हसणं नोटीस करतात. पण याचा जास्त विचार करु नका. कारण हसताना प्रत्येक व्यक्ती चांगला दिसतो. फक्त फार वेड्यासारखं हसू नका. 

4)  तुमची विनोदबुद्धी

आपल्या गंमतीदार गोष्टींनी इतरांना हसवण्याची क्षमता ठेवणाऱ्या मुलांवर मुली जीव ओवाळतात. अशा मुलांच्या आसपास मुली राहणं पसंत करतात. 

5) आत्मविश्वास 

असे म्हणतात की, आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी असते. हे इथेही लागू होतं. तुमच्या वागण्यातील, बोलण्यातील आत्मविश्वासाकडे त्यांचं चांगलंच बारीक लक्ष असतं. 

6) बोलणं

जास्तीत जास्त मुलींना अधिक बोलणं पसंत असतं. त्यामुळे त्यांच्याशी नीट बोला. पण याचा अर्थ असा नाही की, त्यांचं ऐकायचं नाही. जितकं चांगलं तुम्ही बोलाल तितकंच चांगलं तुम्हाला ऐकताही यायला हवं. 

Web Title: Things women notice about men in first meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.