SHOCKING : मुलांवरही होतो ‘इमोशनल अत्याचार’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 15:14 IST
जर एखादी मुलगी आपल्या ब्वॉयफ्रेंडला बरे वाईट बोललीही तरी तो एवढे मनावर घेत नाही, मात्र त्याने जर तिला एक शब्दही चुकीचा बोलला तर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. जाणून घेऊया कशाप्रकारे मुलांवर मुली इमोशनल अत्याचार करतात.
SHOCKING : मुलांवरही होतो ‘इमोशनल अत्याचार’!
आजपर्यंत आपण फक्त मुलींवरच इमोशनल अत्याचार होतो असे ऐकले असेल, मात्र मुलांवरही इमोशनल अत्याचार होतो असे एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे. महिलांवर अत्याचार करणारा पुरुष नेहमी टिकेस पात्र ठरतो, मात्र पुरुषांवरही महिला इमोशनल अत्याचार करतात हे क्वचितच लोकांना माहित असेल. जर एखादी मुलगी आपल्या ब्वॉयफ्रेंडला बरे वाईट बोललीही तरी तो एवढे मनावर घेत नाही, मात्र त्याने जर तिला एक शब्दही चुकीचा बोलला तर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. जाणून घेऊया कशाप्रकारे मुलांवर मुली इमोशनल अत्याचार करतात. * तुझ्यापेक्षा तो चांगला होताजर तुमच्या गर्लफ्रेंडचा फर्स्ट ब्वॉयफ्रेंड दुसरा कोणी होता तर समजून घ्यावे की, तो तिच्या मनातून अजून गेला नाही. बऱ्याचदा तुम्हाला ऐकावे लागेल की, ‘तुला माझी काहीच काळजी नाही, तुझ्यापेक्षा माझा पहिला ब्वॉयफ्रेंड चांगला होता, तो किती काळजी घ्यायचा...’ बिचाऱ्या या मुलाच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा तिला विचारच नसतो. तो तिला सांगु पण नाही शकत की, मग त्याला का सोडले? आणि जर चुकून बोललाही तर मग अजून त्याच्यावर टॉर्चरची सरबत्ती सुरुच. * अश्रूंची नदी बऱ्याचदा मुलाच्या अगदी शिल्लक चुकांमुळे तिच्या डोळ्यातून अश्रंूची नदी वाहते. ही टॉर्चर करण्याची पद्धत तर प्रत्येक गोष्टीत लागू पडते. तिच्या मनाप्रमाणे शॉपिंग न करण्यापासून तर रात्री त्याच्या उशिरा घरी येण्यापर्यंत. या प्रत्येक गोष्टीत ती तिचे अश्रू ढाळत असते. * फोन रिसिव्ह न केल्याने संतप्त जर आपण काही कामानिमित्त आपल्या गर्लफ्रेंडचा फोन रिसिव्ह केला नाही तर किंवा बिझी असाल आणि उत्तर देऊ शकले नसाल तर याचा सर्व संताप तुमच्यावर काढेल आणि तुम्हाला बळीचा बकरा बनवेल. * हिंसक होणे जर मुलगीवर हात उचलला तर तो मुलगा वाईट आणि मात्र बऱ्याचवेळा त्याच्यावर भावनिक अत्याचार तर होतो शिवाय काहीवेळा तर त्याचे कॉलर पकडण्यापर्यंत गोष्ट जाते कधीकधी तर ती त्याच्यावर हातदेखील उचलते.