शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

ब्रेकअपला अनेक वर्ष होऊनही एक्स बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेंड स्वप्नात येते? वाचा कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:43 IST

Relationship Tips : जेव्हा तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असता आणि ती व्यक्ती दूर गेली तर त्यांच्याबाबत तुमच्या मनात विचार येतात.

Relationship Tips : प्रेमाचं नातं जेवढं आनंद देणारं असतं तेवढंच ते किचकट असतं. जर तुमचं ब्रेकअप झालं असेल तर ते आणखीन त्रासदायक होतं. अनेकदा असं होतं की, तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असता आणि अचानक काही कारणाने हे रिलेशनशिप तुटतं. पण त्यानंतरही तुम्हाला तुमच्या स्वप्नात एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड दिसू लागते. काय असतं यामागचं कारण? तेच जाणून घेऊया.

ही तर कॉमन गोष्ट आहे की, जेव्हा तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असता आणि ती व्यक्ती दूर गेली तर त्यांच्याबाबत तुमच्या मनात विचार येतात. आपला मेंदू हा आयुष्यातील चांगल्या-वाईट क्षणांना लक्षात ठेवतो आणि तेच क्षण आपल्याला स्वप्नाच्या रूपात दिसू लागतात. जेव्हा तुम्हाला वाटतं की, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेन्डला किंवा गर्लफ्रेन्डला विसरले आणि अचानक ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येऊ लागते. अशात ही एक आश्चर्यजनक बाब नक्कीच आहे. पण अनेकदा असंही होतं की, तुम्ही तुमच्या वर्तमानातील पार्टनरऐवजी तुमच्या एक्सला स्वप्नात अधिक बघता. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. 

तुमच्या आयुष्यात नसलेला तुमचा एक्स बॉयफ्रेन्ड/गर्लफ्रेंड तुमच्या स्वप्नात येत असेल तर सामान्यपणे असं होण्याचं कारण तुमचं सब-कॉन्शस मन असतं. यावर तुमचं नियंत्रण नसतं. जर तुमच्यासोबतही असं होतं असेल तर जास्त हैराण होण्याची गरज नाहीये.

याचा अर्थ असा अजिबात नाही की, तुम्ही तुमच्या एक्स बॉयफ्रेन्डवर अजूनही प्रेम करता. त्यामुळे तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांचा उगाच काहीही अर्थ काढत बसू नका. तुमच्या एक्स बॉयफ्रेन्डला स्वप्नात बघण्याचा अर्थ असा अजिबात नाही की, आजही तुमच्या मनात त्याच्याविषयी प्रेम भावना आहे.

एक्स बॉयफ्रेन्डला किंवा गर्लफ्रेन्डला स्वप्नात बघण्याच एक अर्थ असाही असू शकतो की, त्या व्यक्तीने तुम्हाला फार खोलवर जखम दिली आहे. तुम्ही अजून हे समजू शकला नाहीत की, एखादी व्यक्ती कुणासोबत असंही करू शकते.हे गरजेचं नाही की, एक्स बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेन्डसोबत घालवलेला प्रत्येक क्षण बेकार असेल. तुम्ही कधीना कधी एकत्र असे क्षण घालवले असतील जे कधीही विसरता येत नाहीत आणि या क्षणांमुळेच एक्स तुमच्या स्वप्नात येतो.

एक्स बॉयफ्रेन्डसोबत एखादी अशी न सोडवली गेलेली समस्या अशा स्वप्नांचं कारण बनते. याच दोघातील न सोडवल्या गेलेल्या समस्येमुळेही एक्स स्वप्नात येऊ शकतात. ही समस्या दूर करायची असेल तर जुन्या गोष्टींचा फार विचार करणं बंद करावं.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप