शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'या' राशींचं एकमेकांशी अजिबात पटत नाही; लगेच होऊ शकतं ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 11:52 IST

अनेक कपल्सचं नातं फार सुंदर असतं, पण काही कपल्सचे स्वभाव जुळत नाही, तर सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडत राहतात. अशातच कपल्समध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने सुरू राहत नाहीत.

अनेक कपल्सचं नातं फार सुंदर असतं, पण काही कपल्सचे स्वभाव जुळत नाही, तर सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडत राहतात. अशातच कपल्समध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने सुरू राहत नाहीत. त्यावेळी नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. एवढचं नाहीतर नातं तुटण्याचीही शक्यता निर्माण होते. असं होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, दोघांचा स्वभाव किंवा पर्सनॅलिटी फार वेगळी असते. 

असं सांगितलं जातं की, आपला स्वभाव काही राशींवरून समजणं शक्य असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशींबाबत सांगणार आहोत. ज्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही.  तसेच जर अशा राशींच्या व्यक्ती एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करत असतील तर त्यांच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार येऊ लागतात. जाणून घेऊयात अशाच काही राशींबाबत... 

नात्यामध्ये येण्याआधी कोणीही राशींचा फारसा विचार करत नाही. परंतु, नातं पुढे नेण्यासाठी आणि नात्यामधील भांडणांपासून बचाव करण्यासाठी राशी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

जाणून घेऊया कोणत्या राशीच्या जोड्यांचं नातं जास्त वेळापर्यंत टिकू शकत नाही. 

मेष राशी आणि कर्क राशी 

मेष राशीच्या व्यक्ती पारच केअरिंग असतात. या व्यक्ती सतत एखाद्या गोष्टीची काळजी करत बसतात. पण याउलट कर्क राशीच्या व्यक्ती सतत आपल्याबाबतच विचार करत असतात. असं सांगितलं जातं की, याच कारणामुले या दोन्ही राशींच्या व्यक्तींमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून खटके उडत असतात. अनकेदा ही भांडणं नातं तुटण्यासही कारणीभूत ठरतात. 

(Image Credit : Cooperative Therapy)

वृषभ राशी आणि सिंह राशी

असं सांगितलं जातं की, या दोन्ही राशींच्या व्यक्ती मर्यादेपेक्षा जास्त रागीट असतात. यांच्या नात्यामध्ये भांडण होण्याची सर्वा मोठी कारणं म्हणजे, यांचा हट्ट आणि अहंकार. जेव्हा दोन्ही व्यक्तीं रागात असतात. त्यावेळी कोणीही एकमेकांचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं. त्यामुळे या दोन राशींच्या व्यक्तींचं नातं फार काळ टिकत नाही. 

(Image Credit : iStock)

मिथुन राशी आणि कन्या राशी

कन्या आणि मिथुन राशीच्या व्यक्तींची पर्सनॅलिटी एकमेकांपेक्षा वेगळी असते. असं सांगितलं जातं की, कन्या राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतात. याउलट मिथून राशीच्या व्यक्तींना प्रत्येक बाबतीत स्वातंत्र्य पाहिजे असतं. त्यामुळे यांचा ताळमेळ अजिबात बसत नाही आणि दोघेही वेगळं होण्याचा विचार करतात. 

(Image Credit : Healthista)

कर्क राशी आणि तूळ राशी 

कर्क राशीच्या व्यक्तींना इतरांची काळजी घ्यायला फार आवडते. परंतु, तूळ राशीच्या व्यक्तींना त्यांचं असं वागणं म्हणजे, त्यांच्यावर केलेली जबरदस्ती वाटत असते. त्यामुळे त्यांचं नातं आपली ओळख निर्माण करू शकत नाही. 

(Image Credit : Mike & Susan Dawso)

मकर राशी आणि तूळ राशी

मकर राशीच्या व्यक्तींना अनावश्यक गोष्टींबाबत चर्चा करायला अजिबात आवडत नाही. तसेच तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचा आनंद अनुभवणं फार आवडतं. असं सांगितलं जातं की, स्वभाव अगदी विरूद्ध असल्यामुळे या राशीच्या लोकांचं नातं फार काळ टिकू शकत नाही. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही.)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व