शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'या' राशींची मुलं असतात फ्लर्टिंगमध्ये एक्स्पर्ट; तुमचा बॉयफ्रेंड तर तसा नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 16:54 IST

काही मुलं अशी असतात, ज्यांचा प्रेमावर जास्त विश्वास नसतो. परंतु, फ्लर्ट करण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. यांच्यासाठी फ्लर्ट करणं एक कला असते.

(Image Credit : Sweety High)

काही मुलं अशी असतात, ज्यांचा प्रेमावर जास्त विश्वास नसतो. परंतु, फ्लर्ट करण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. यांच्यासाठी फ्लर्ट करणं एक कला असते. आता यांच्या फ्लर्टिंग करण्याची मर्यादा कोणती, हे पूर्णतः परिस्थितीवर अवलंबून असतं. असं सांगितलं जातं की, अशी मुलं आपल्या पार्टनरसमोरही दुसऱ्या मुलींसोबत फ्लर्ट करण्याची संधी सोडत नाहीत. यांच्या याच सवयीमुळे अनेकदा त्यांच्या नात्यामध्ये दुरावाही येतो. पण तरिही यांच्यावर मात्र काहीही परिणाम होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशीच्या मुलांबाबत सांगणार आहोत. जे कधीही फ्लर्ट करू शकतात. जर तुमचाही पार्टनर यापैकी एखाद्या राशीचा असेल, तर जरा सांभाळूनच राहा. 

(Image credit : Romper)

मिथून राशी 

मिथून राशीच्या व्यक्ती फार सोशल असतात, कारण यांना लोकांसोबत स्वतःहून बोलायला फार आवडतं. असं म्हटलं जातं की, पहिल्याच भेट या व्यक्ती आपल्या दिलखुलास बोलण्यामुळे स्वतःकडे लोकांना आकर्षित करून घेतात. यामुळेच मुली यांच्याकडे लगेच आकर्षित होतात. पण त्यांना अजिबात माहिती नसतं की, फ्लर्ट करणं यांच्या सवयीचाच भाग आहे. 

तूळ राशी 

असं म्हटलं जातं की, तूळ राशीची मुलं फार चार्मिंग असतात. यांची बोलण्याची पद्धतही अत्यंत वेगळी असते. यामुळेच मुली यांच्याकडे लगेच आकर्षित होतात. स्वभावाने रोमॅन्टिक असणारी या राशीची मुलं फार चलाखीने फ्लर्ट करतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला अजिबात समजत नाही की, हे खरं प्रेम करत आहेत की फक्त फ्लर्ट करत आहेत. 

सिंह राशी 

सिंह राशीच्या मुलं अधिक आकर्षक असतात. लोकांना आपल्याकडे आकर्षित करणं यांना फार उत्तम जमतं. यांच्या याच गुणांमुळेच या प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान तयार करतात. एवढचं नाहीतर या व्यक्ती फ्लर्टही अगदी परफेक्शनसोबतच करतात. परंतु, समोरची व्यक्ती जेव्हा यांच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत असेल तरच ही मुलं फ्लर्ट करतात. 

वृश्चिक राशी

असं म्हटलं जातं की, या राशीच्या मुलांचा फ्लर्ट करण्याचा अंदाज फार वेगळा असतो. या व्यक्ती पहिल्या भेटीतच लोकांसोबत कन्फर्टेबल होतात. त्यानंतर ही मुलं हसत खेळत फ्लर्ट करायला सुरुवात करतात. पण ही मुलं तेव्हाच असं करतात, जेव्हा यांना समोरच्या व्यक्तींमध्ये इंटरेस्ट असतो. यांच्याबाबतची सर्वात खास गोष्ट म्हणजे, या व्यक्ती एखाद्या पर्सनल व्यक्तीलाच आपला मौल्यवान वेळे देणं पसंत करतात. 

मेष राशी

मेष राशीची मुलं स्वाभावेन फार हट्टी, आयडिअल, रागिट असतात. परंतु, हे फ्लर्ट करण्यातही तेवढेचं माहिर असतात. असं म्हणतात, जर यांना कोणी आवडलचं तर त्या व्यक्तीला आपल्या मानातील गोष्ट सांगण्याची सुरुवात हे फ्लर्ट करण्यापासून करतात. पण जर यांना दिसून आलं की, आपल्या जे मनात आहे, तेच समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, तर मात्र हे थेट आपल्या मनातील गोष्ट सांगून मोकळे होतात. जर यांना समोरच्या व्यक्तीमध्ये काहीही इंटरेस्ट नसेल तर हे त्यांच्याकडे फारसं लक्षं देत नाहीत. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व