शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

'हे' गुण असणाऱ्या पुरूषांकडे पटकन आकर्षित होतात लोकं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 17:21 IST

आपलं व्यक्तिमत्व जेवढं नम्र तेवढी लोकं आपल्याकडे आकर्षित होतात. सर्वांना समजून घेणाऱ्या, मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्ती सर्वांना जवळच्या वाटतात. ज्या लोकांचे विचार सर्वांना आवडतात.

आपलं व्यक्तिमत्व जेवढं नम्र तेवढी लोकं आपल्याकडे आकर्षित होतात. सर्वांना समजून घेणाऱ्या, मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्ती सर्वांना जवळच्या वाटतात. ज्या लोकांचे विचार सर्वांना आवडतात. अशा व्यक्तिंचा मित्रपरिवारही मोठा असतो. प्रत्येक ठिकाणी त्यांना आदर मिळतो. त्यामुळे जाणून घेऊयात पुरूषांमध्ये असेलल्या अशा स्वभाव गुणांबद्दल जे सर्वांच्या मनावर राज्य करतात. 

महिलांचा आदर करणारे 

ज्या पुरूषांचे मन आणि विचार फार प्रगल्भ असतात. ते नेहमी महिलांचा आदर करतात. अशा व्यक्तिंच्या जीवनात मैत्रिणींची कमतरता नसते. या व्यक्ती महिलांचा आदर करतात आणि त्यांची कालजी घेतात म्हणून त्यांच्याकडे महिला अधिक आकर्षित होतात.

कोणतेही काम विचारपूर्वक करणे

एका चांगल्या व्यक्तिमत्वाची खूण म्हणजे कोणतेही काम करताना ते विचारपूर्वक करतात. जेणेकरून अविचारीपणामुळे किंवा घाईमध्ये निर्णय घेतल्यामुळे पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. 

आपल्या लोकांची काळजी करणं

ज्या व्यक्ती घरातील कर्त्या असतात आणि जबाबदारी म्हणून सर्वांची काळजी घेतात. अशा व्यक्तिंकडेही लोकं अधिक आकर्षित होतात. 

खऱ्याची साथ देणं

ज्या व्यक्ति चांगल्या व्यक्तिमत्वाच्या असतात, त्या नेहमी खऱ्याची बाजू घेतात. ते निडरपणे खऱ्याच्या बाजूनेच उभे रहातात. ज्या गोष्टी त्यांना चुकीच्या वाटतात त्यांच्याबाबत ते बोलताना अजिबात घाबरत नाहीत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व