शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मोठी होत असलेली मुलं तुमचं ऐकत नाहीत? वापरून बघा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 16:05 IST

Parenting : अशावेळी त्यांच्यावर राग व्यक्त करण्याऐवजी विचार करावा की, त्यांना कसं समजावून सांगणार. कारण त्यांना तुम्ही लहान मुलांसारखंही वागवू शकत नाही आणि ना मोठ्यांसारखं.

Parenting : लहान मुलं जेव्हा मोठी होत असतात किंवा तारूण्यात येत असतात तेव्हा सगळ्याच पालकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. बरीच मुलं किंवा मुली पालकांचं ऐकत नाही. त्यांना त्यांचंच खरं वाटतं आणि आई-वडिलांचं चुकीचं वाटतं. अशात पालक मुलांवर चिडतात. पण अशावेळी त्यांच्यावर राग व्यक्त करण्याऐवजी विचार करावा की, त्यांना कसं समजावून सांगणार. कारण त्यांना तुम्ही लहान मुलांसारखंही वागवू शकत नाही आणि ना मोठ्यांसारखं. कारण त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो. त्यामुळे तुम्हीच समजदारी दाखवत काहीतरी मार्ग काढणं गरजेचं असतं. 

त्यांची मानसिकता समजून घ्या

एक पालक म्हणून हे गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या मोठ्या होत असलेल्या मुलांमधील बदलांना समजून घ्या. या काळात मुला-मुलींचं मन फार अशांत राहतं आणि हे त्यांच्या शरीरात होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे होतं. यासोबतच ते समाजात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि या चढ-उतारात त्यांना भावनात्मक आधाराची गरज असते. 

तुम्ही शांत रहा

पालक या नात्याने तुम्हाला तुमच्यावर फार संयम ठेवावा लागेल. तुम्हाला तुमच्या मुलांचा मित्र होऊन बोलण्याची गरज नाही. कारण जर तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र झालात तर तुम्ही त्यांना योग्य किंवा चूक यातील फरक समजावून सांगू शकणार नाहीत. तुम्ही स्वत:हून समजून घ्या आणि मुलांसोबत अशी बॉंडींग तयार करा की, ते स्वत:हूनच तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्टी सांगतील आणि तुमच्याकडून सल्ला घेतील.

आधी स्वत:त करा बदल

मुला-मुलींमध्ये चांगले गुण टाकण्याआधी तुम्हाला तुमच्या आत डोकावून बघावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर तुमचं उदाहरण द्याल तर ते लवकर समजू शकतील. सोबतच या वयातील मुला-मुलींसोबत घर-परिवाराबाबत बोला. त्यांच्याशी आर्थिक आणि कौंटुबिक मुद्द्यांवर बोला. तसेच त्यांच्या करिअरशी संबंधित गोष्टींवर बोला. या गोष्टी करून त्यांच्यात समजदारी आणि गंभीरता निर्माण होईल.   

टॅग्स :Parenting Tipsपालकत्वrelationshipरिलेशनशिप