शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एकटेपणा घालवण्याची अनोखी संकल्पना, भाड्याने मिळवा फॅमिली अन् काही दिवस रहा सोबत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 12:31 IST

सध्याच्या लाइफस्टाइलचे जसे अनेक फायदे आहेत तसेच काही नुकसानही आहेत. जगभरातील लोकांना एकटेपणाचा सामना करावा लागत आहे.

(Image Credit : The Quint)

सध्याच्या लाइफस्टाइलचे जसे अनेक फायदे आहेत तसेच काही नुकसानही आहेत. जगभरातील लोकांना एकटेपणाचा सामना करावा लागत आहे. पण जपानी लोकांनी एकटेपणा दूर करण्यासाठी एक मार्ग शोधून काढला आहे. जपानमध्ये लोक मित्रांना आणि परिवारांना घरी काही वेळ घालवण्यासाठी ऑफर देत आहेत. इतकेच नाही तर जपानी लोक एका वेळचं जेवण देण्याचीही ऑफर देत आहेत. काही लोकांनी तर यासाठी जाहिरातही दिली आहे. यात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांचा परिवारत नाही. तर काही लोकांच्या परिवारातील लोकांचे सदस्य सोबत राहत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून अशाप्रकारच्या सर्व्हिसचा ट्रेन्ड वाढत आहे.

१० वर्षांआधी झाली होती सुरूवात

(Image Credit : Dainik Bhaskar)

या ट्रेन्डची सुरूवात २०१० मध्ये जपानची कंपनी फॅमिली रोमान्सने केली होती. ही एकप्रकारची रेंटल सर्व्हिस आहे. कंपनीच्या मदतीने जपानच्या काजुशीग निशिदाने त्यांच्या जेवण करायला येण्यासाठी दोन लोकांसाठी जाहिरात दिली होती. निशिदा यांचं म्हणणं आहे की, ही जाहिरात एक महिला आणि तिच्या मुलीसाठी देण्यासाठी देण्यात आली होती. यानुसार एक दिवसासाठी कोणताही महिला आणि तिची मुलगी इथे राहू शकत होते.

(Image Credit : thesun.co.uk)

निशिदा सांगतात की, माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि मुलगी तिच्या घरी राहते. जेव्हा पत्नी आणि मुलीच्या रूममध्ये भाडेकरू येतात तेव्हा मला वाटतं की, ते माझा परिवार आहेत. अशाप्रकारे एकटेपणा दूर होतो. निशिदा यांना अशाप्रकारच्या सर्व्हिसची माहिती टीव्हीवर मिळाली होती. निशिदा यांनी गेल्या दोन वर्षांपासून ९ वेळा ही सर्व्हिस दिली आहे. यासाठी एका व्यक्तीला एका दिवसासाठी १४ हजार रूपये द्यावे लागतील. 

(Image Credit : thesun.co.uk)

रोमान्स फॅमिलीचे सीईओ यूइची इशी सांगतात की, 'ही संकल्पना मला तेव्हा सुचली जेव्हा मी २४ वर्षांचा होतो. माझा एक मित्र आणि त्याची पत्नी वेगळे राहत होते. त्याच्या पत्नीला मुलाचं अ‍ॅडमिशन किंडरगार्टेनमध्ये करायचं होतं. पण सिंगल आई असल्याने अधिकाऱ्यांनी तिचा अर्ज फेटाळला. त्यामुळे मी कंपनी सुरू केली'.

यूइची यांच्यानुसार, कंपनीच्या मदतीने काही वेळेसाठी किंवा काही दिवसांसाठी भाड्याने फॅमिली किंवा मित्रांची साथ मिळवली जाऊ शकते. वर्तमानात कंपनीकडे २५० पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व्हिसमधील ९८ टक्के लोकांनी याला चांगलं म्हटलं आहे.

टॅग्स :Japanजपानrelationshipरिलेशनशिप