शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Mother's Day : आईसाठी यापेक्षा भारी गिफ्ट असूच शकत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 12:52 IST

काहीजण आईसाठी काय गिफ्ट घ्यावं याचा विचार करतील, तर काही लोक आईला कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन करत असेल.

(Image Credit : Aleteia)

सध्या अनेकजण मदर्स साजरा करण्यासाठी तयारी करत असतील. काहीजण आईसाठी काय गिफ्ट घ्यावं याचा विचार करतील, तर काही लोक आईला कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन करत असेल. पण हा क्षणीक आनंद देण्यापेक्षा आईला तिच्या उतारवयात काही वेगळं द्यायचं असेल किंवा तिचं आयुष्य वाढवायचं असेल तर एक वेगळा उपाय आहे. या मदर्स डे ला आईसाठीसाठी यापेक्षा वेगळं गिफ्ट असूच शकत नाही.

(Image Credit : Travel + Leisure)

चॅटिंग किंवा कामाच्या फोनचा अडसर न होऊ देता तुम्ही तुमच्या आईसोबत किती दिवसांआधी वेळ घालवला होता? तुम्हाला आठवतं का तुम्ही शेवटचं कधी तिला स्पेशली फोन करून विचारलं की, आई कशी आहेस? किंवा कसं सुरु आहे? शेवटचं कधी तुम्ही आईसोबत चहाचे घोट घेत जीवनाबाबत किंवा भविष्याबाबत गप्पा केल्या? जर हे प्रश्न विचारल्यावर लगेच तुम्हाला दिवस आठवत नसेल तर ही गोष्ट करुन फार काळ लोटला असेल असे गृहीत धरुया. 

आपल्यापैकी अनेकजण जीवनाच्या धावपळीत इतके बिझी झाले आहेत की, त्यांच्या हेही लक्षात येत नाही की आपले आई-वडील आता वृद्ध होत आहे. शेवटची कधी तुम्ही केवळ आईसाठी वेळ घालवण्यासाठी मिटींग कॅन्सल हेही अनेकांना आठवत नसेल. 

आई वृद्ध होतीये...

(Image Credit : Canaan)

धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आणि कामाच्या वाढत्या बोझामुळे आपण हे विसरुनच जातो की, घड्याळाचे काटे सतत फिरत आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत आईचं वयही वाढत आहे. रोज सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक नवीन सुरकुती आलेली असते. तुमचा हात धरुन घराचे तीन माळे झरकन चढून जाणाऱ्या तुमच्या आईला आता हेच तीन माळे चढताना ब्रेक घ्यावा लागतो.  जरा वेळ काढून तुम्ही तुमच्या आईकडे निट बघाल तर तिच्यात झालेले शारीरिक बदल पाहून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. पण तितका वेळ कुणाकडे नाहीये. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, असं काही आहे जे करुन तुम्ही तुमच्या आईचं आयुष्य वाढवू शकता. तर तुम्ही काय कराल? आनंदाने अनेकजण ही गोष्ट आईसाठी नक्की करतील, असं गृहीत धरुन चालूया.

काय आहे रिसर्च?

(Image Credit : www.relationshipsnsw.org.au)

यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये २०१२ साली करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ज्या वयोवृद्धांना चांगली साथ मिळते, सहकार्य मिळतं, ते एकटेपणा सोसत असलेल्या लोकांपेक्षा जास्त आयुष्य जगतात. हा रिसर्च १६०० वयोवृद्धांवर करण्यात आला आणि त्यांच्या सोशल संवादाचं निरीक्षण करण्यात आलं. 

काय निघाला निष्कर्ष?

या रिसर्चमधून हे समोर आलं की, एकटेपणा सोसत असलेल्या वयोवृद्धांचं आरोग्य ढासळत आहे. एकटेपणामुळे वृद्धांचं राहणीमानंच खालावत नाही तर याने त्यांचं वजन वाढण्याचा आणि डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका वाढतो. तसेच त्यांचा वेळेआधी मृत्यूही होऊ शकतो. एकटेपणा हा कुणालाही निराश करणाराच असतो, पण याचा वाईट प्रभाव वयोवृद्धांवर अधिक बघायला मिळतो. AARP फाऊंडेशननुसार, दिवसाला १५ सिगारेटी ओढल्याने जेवढा प्रभाव आरोग्यावर पडतो, तेवढाच एकटेपणाही तुमच्या आरोग्यावर वाईट प्रभाव करतो.

(Image Credit : AARP)

तुमच्या आजूबाजूला जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारी लोकं असतात, तुम्ही सतत हसत असता तेव्हा हे तुमच्यासाठी एकप्रकारे औषधच ठरतं. मग वाट कसली बघताय लगेच फोन उचला आणि आईला फोन करा. तसेच थोडा जास्त वेळ काढून तिला भेटा आणि तिच्याशी गप्पा करा. याने नक्कीच त्यांना फायदा होईल. पण यावेळी नेहमीसारखं न भेटता वेगळ्याप्रकारे भेटा.

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेRelationship Tipsरिलेशनशिप