लव्ह मॅरेज तर केलं, पण आता खाने के लाले?.

By Admin | Updated: June 2, 2017 19:45 IST2017-06-02T19:35:07+5:302017-06-02T19:45:13+5:30

अनेक जण लव्हमॅरेज करतात. जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांना फक्त प्रेम आणि प्रेमच दिसत असतं, त्याशिवाय दुसर्‍या कोणत्या गोष्टीचा विचारच त्यांच्या मनात येत नाही.

Love made meres, but now I eat it? | लव्ह मॅरेज तर केलं, पण आता खाने के लाले?.

लव्ह मॅरेज तर केलं, पण आता खाने के लाले?.

अनेक जण लव्हमॅरेज करतात. जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांना फक्त प्रेम आणि प्रेमच दिसत असतं, त्याशिवाय दुसर्‍या कोणत्या गोष्टीचा विचारच त्यांच्या मनात येत नाही. आपल्या भविष्याचं काय, जबाबदार्‍यांचं काय, त्या आपण कशा पद्धतीने पार पाडणार याचा काहीच विचार त्यांनी केलेला नसतो. ते घरच्यांच्या विरोधात जाऊन ते लग्न तर करतात, पण काही दिवसांतच त्यांना दाल-आटे का भाव समजायला लागतो. बर्‍याचदा त्यावरुनच भांडणंही व्हायला लागतात आणि या प्रेमात खटके उडायला लागतात.

 
 
 
 
 
अशावेळी नेमकं काय होतं?
 
 
 
4. पळून जाऊन, इच्छेविरुद्ध केलेलं लग्न असेल, तर मुलाकडचे त्याची आर्थिक कोंडी करतात. मुलीकडची माणसं रागावून मुलीशी संबंध तोडतात. आणि त्यामुळे हा धोका अजूनच वाढतो.
5. अशा वेळी प्रत्येक प्रश्न समजुतीनं सोडवला नाही, तर घरचे त्यांच्यात सहज फूट पाडून घरी परत ये, दुकान तुझ्या नावावर करून देतो, असं काही तरी आमिष मुलाच्या घरची मंडळी दाखवतात. जर का बायको आर्थिक चणचणीवरून कटकट करत असेल, तर मुलगा त्याकडे सहज ओढला जाऊ शकतो.
6. कधीकधी मुलीच्या घरचे तिला सांगतात, की ‘वडिलांनी जेवण सोडलंय, आईनं अंथरूण धरलंय, एकदा तरी घरी येऊन जा. आम्ही काही बोलणार नाही’ आता हे खरंही असू शकतं. पण असंही असू शकतं, मुलगी घरच्यांवर विश्वास ठेवून घरी जाते आणि मग भावनिक चक्रात अडकते. किंवा तिला कोंडून ठेवतात आणि ती परत येऊ शकत नाही.
  हे टाळण्यासाठी सांसारिक जबाबदार्‍यांचा आधी विचार करणं आणि त्यासाठी मनाची तयारी हाच सवरेत्तम मार्ग आहे. आपल्या जबाबदार्‍यांचं आपल्याला भान नसलं तर मग मोठीच आफत ओढवते आणि ही लव्ह मॅरेजेस मग निष्फळ ठरतात. परिस्थितीनं दिलेले ‘फटके’ इतके जोरदार ठरतात, की मग आपल्या निर्णयाचा पश्चात्तापही व्हायला लागतो. त्यासाठी या सार्‍या गोष्टींचा मुळातूनच विचार करायला हवा.

Web Title: Love made meres, but now I eat it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.