शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात तुम्ही कसे वागाल; जाणून घ्या तुमच्या राशीवरुन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 15:04 IST

आपल्या राशीनुसार आपल्याला अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. आपलं व्यक्तिमत्त्व, आपला स्वभाव यांसारख्या गोष्टींसोबतच आपल्या रिलेशनशिपमध्ये आपल्या पार्टनरसोबत तुमचं कसं जमणा

आपल्या राशीनुसार आपल्याला अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. आपलं व्यक्तिमत्त्व, आपला स्वभाव यांसारख्या गोष्टींसोबतच आपल्या रिलेशनशिपमध्ये आपल्या पार्टनरसोबत तुमचं कसं जमणार? याबाबतही समजतं. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या राशीवरून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कसे वागाल किंवा त्यांच्यासाठी काय कराल याबाबतही जाणून घेणं शक्य होतं, असं सांगण्यात येतं. जाणून घेऊया राशींनुसार, प्रेमात पडल्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कसे वागणार... 

मेष रास 

प्रेमामध्ये स्वतःच्या फिलिंग्स मोकळेपणाने जाहिर करतात. मेष राशीच्या लोकांना कोणतीही गोष्ट लपवणं अजिबात शक्य नसतं. गरज पडल्यानंतर आपल्या प्रेमाला स्वतःपेक्षा जास्त मानतात. 

वृषभ रास 

वृषभ राशीच्या लोक प्रेमामध्ये अत्यंत पझेसिव्ह असतात. या व्यक्ती आपल्या पार्टनरला पूर्ण वेळ देतात. परंतु जर पार्टनर यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर हेदेखील आपल्या वेगळ्या विश्वात रमून जातात. 

मिथुन रास

या राशीच्या व्यक्ती संपूर्ण इमोशन्सने आपल्या पार्टनरवर प्रेम करतात. यांचा रोमान्सही थोडा ड्रामाटिक असतो. परंतु, या व्यक्ती नात्यामधील प्रेम टिकवून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येते. 

कर्क रास 

कर्क राशीच्या व्यक्ती इमोशनल लव्हर असतात. या व्यक्ती पार्टनरच्या गरजांची काळजी घेतात. पण असं सांगितलं जातं की, या व्यक्ती नात्यामध्ये अनेकदा स्वतःसा इतकं वाहून घेतात की, स्वतःचं अस्तित्व विसरून जातात.

सिंह रास 

सिंह म्हणजे जंगलाचा राजा, त्याचप्रमाणे या व्यक्तीही प्रेमावर राज्य करतात. म्हणजे असं नव्हे की, या व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत चुकीचा व्यवहार करतात. नातं कसं असायला पाहिजे आणि पार्टनरने यांच्यासोबत कसं राहावं किंवा कसं वागावं? या गोष्टी हे स्वतःच डिसाइड करतात. 

कन्या रास 

प्रेमाचं नातं कसं निभावलं पाहिजे, याबाबत कन्या राशीच्या व्यक्ती संपूर्ण योजना तयार करून ठेवतात. असं सांगितलं जातं की, प्रेम व्यक्त करण्यापासून रोमान्स करेपर्यंत प्रत्येक गोष्टी फार विचारपूर्वक करतात. 

तूळ रास 

जर तुमचा पार्टनर तूळ राशीचा असेल तर तुम्ही खरचं खूप भाग्यवान आहात. कारण असं सांगण्यात येतं की, या राशीचे लोक प्रेमामध्ये आपल्या पार्टनरला फार प्रेमाने वागवतात. त्यांची काळजी घेतात. पार्टनरची प्रत्येक लहान-मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सतत झटत असतात. 

वृश्चिक रास 

या राशीच्या लोकांचा स्वभाव इतर राशीच्या लोकांच्या अत्यंत विरूद्ध असतो. असं सांगितलं जातं की, जर या लोकांना त्यांचं खरं प्रेम मिळालं तर, ते शेवटपर्यंत आपल्या प्रेमासोबत राहतात. पण जर या व्यक्तींना पार्टनरने धोका दिला तर मात्र या व्यक्ती पुन्हा आपल्या पार्टनरचा विचारही करत नाहीत. 

धनू रास 

धनू राशीच्या व्यक्ती कोणताही नियम, अटी न ठेवता प्रेम करतात. त्यांच्या पार्टनरनेही त्यांच्यावर असचं प्रेम करावं अशी त्यांची नेहमी इच्छा असते. प्रेमामध्ये कोणतीही वस्तू घेण्याऐवजी ते आपल्या पार्टनरला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. 

मकर रास 

या राशीच्या व्यक्ती कधीच आपल्या पार्टनरला आपल्या प्रेमाबाबत जाऊन सांगत नाहीत. असं सांगितलं जातं की, या व्यक्ती सांगण्यापेक्षा पार्टनरला आपल्या वागण्यातून त्याच्यावरील प्रेम सांगतात. 

कुंभ रास 

कुंभ राशीच्या व्यक्ती आपल्या पार्टनरसोबतचं नातं एन्जॉय करतात. परंतु, जर पार्टनर यांच्यावर निर्बंध लादत असेल किंवा त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते नातं बराच काढ टिकवू शकत नाहीत. 

मीन रास 

मीन राशीच्या व्यक्ती प्रेमामध्ये अत्यंत संवेदनशील असतात. एकदा ते एखाद्या व्यक्तीसोबत मनापासून कनेक्ट झाले तर शेवटपर्यंत त्यांचीच साथ देतात, असं सांगितलं जातं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यPersonalityव्यक्तिमत्वRelationship Tipsरिलेशनशिप