शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पार्टनरचे तुमच्यावर किती प्रेम आहे? सांगतायेत 'या' राशी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 16:17 IST

जाणून घेऊया राशींनुसार, तुमचा पार्टनर तुमच्यावर किती प्रेम करतो आणि तो तुमच्या नात्याबाबत काय विचार करतो,

ज्योतिष शास्त्रातील बारा राशी आपल्या स्वभावाबाबतच्या अनेक गोष्टी सांगतात. आपल्या बोलण्याची पद्धतीपासून, आपण काय विचार करतो? आणि आवडीनिवडींबाबत सर्व गोष्टी जाणून घेणं शक्य होतं. रिलेशनशिपमध्ये तुम्ही कसे वागणार?, पार्टनर कसा असेल? यांसारख्या अनेक गोष्टी जाणून घेणं शक्य होतं. जाणून घेऊया राशींनुसार, तुमचा पार्टनर तुमच्यावर किती प्रेम करतो आणि तो तुमच्या नात्याबाबत काय विचार करतो, त्याबाबत... 

मेष राशी

जर तुमच्या पार्टनरची रास मेष असेल तर, या राशीच्या व्यक्ती स्वतंत्र असतात. ते त्यांना वाटेल तसं त्यांचं आयुष्य जगतात. असं सांगितलं जातं की, रिलेशनशिपमध्ये भरूपर प्रेमाचं नेहमीचं स्वागत करतात. परंतु, जर गर्लफ्रेंड त्यांना आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या नात्याला ते फारसं महत्त्व देत नाहीत. 

वृषभ राशी

असं सांगितलं जातं की, या राशीची मुलं आपल्या पार्टनरवर अवलंबून असतात. यांचं सुख आणि दुःख दोन्ही आपल्या पार्टनरवर अवलंबून असतं. रिलेशनशिपमध्ये भावनाचं यांच्यासाठी सर्वकाही असतात. तसेच आपल्या पार्टनरसोबत असताना ते इतर कोणाचाही विचार करत नाहीत. 

मिथुन राशी

मिथून राशीची मुलं आपल्या रिलेशनशिपबाबत नेहमी पॉझिटिव्ह असतात. नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी हे अनेक नवनवीन प्रयोग करत असातत. त्यामुळए पार्टनरही त्यांच्याबाबत नेहमी पॉझिटिव्ह फिल करतो.

 

कर्क राशी 

असं सांगितलं जातं की, या राशीची मुलं आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात, तसेच ते त्यांची  काळजीही घेतात. या राशींच्या व्यक्ती तसं पाहायला गेलं तर फार इमोशनल असतात. त्यामुळे नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास राखण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. 

सिंह राशी 

सिंह राशीची मुलं प्रचंड रागीट असतात. पण या कधीही आपल्या पार्टनरला धोका देत नाहीत. असं सांगितलं जातं की, जर यांचं प्रेम खरं असेल, तर ते शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु, जर पार्टनरने त्यांना धोका दिला तर त्याचं चोख उत्तर दिल्याशिवाय गप्प बसत नाहीत. 

कन्या राशी 

कन्या राशीची मुलं फार समजुतदार आणि पॉझिटिव्ह असतात. पार्टनरची ते फार काळजी घेतात. एखादी गोष्ट बोलण्याआधी आणि निर्णय घेण्याआधी ते अनेक गोष्टी पडताळून पाहतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात. 

तूळ राशी 

या राशीच्या मुलं फार रोमॅन्टिक असतात. जर तुम्हीही रोमॅन्टिक पार्टनरच्या शोधात असाल तर या राशीच्या मुलांना नक्की डेट करा. असं सांगितलं जातं की, या राशीची मुलं आपल्या पार्टनरसोबत लॉयल असतात. 

वृश्चिक राशी 

वृश्चिक राशीची मुलं फार चार्मिंग असतात. असं सांगितलं जातं की, ही मुलं फार कॉन्फिडंट असतात. पार्टनरला केलेलं प्रत्येक वजन ही मुलं निभावतात. एवढचं नाहीतर ते आपलं नातं सर्वांसमोर उघडपणे जाहिर करतात. 

धनु राशी 

असं सांगितलं जातं की, या राशीच्या व्यक्ती आपलं नातं फार सुंदरपणे निभावतात. ते आपल्या पार्टनरला खूश ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. आनंदासोबतच हे दुःखामध्येही पार्टनरला पूर्णपणे सपोर्ट करतात. 

मकर राशी 

मकर राशीच्या व्यक्ती समजूतदार असतात. नातं निभावणं त्यांना फार उत्तम पद्धतीने जमतं. परंतु, जर गोष्ट मजा-मस्तीची असेल तर ते थोडे मागे पडतात. असं म्हणतात की, त्यांच्यातील मॅच्युरिटीमुळे ते प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करतात. 

कुंभ राशी 

असं सांगितलं जातं की, या राशीची मुलं आपल्या पार्टनरला नात्यामध्ये स्पेस देतात. त्यामुळे यांच्या नात्यामध्ये दुरावा येत नाही. 

मीन राशी 

या राशीची मुलं संवेदनशील असतात. लहान-लहान गोष्टींची महत्त्व ओळखून योग्य वेळी तिचा वापर करणं यांना फार योग्य प्रकारे जमतं. असं समजलं जातं की, या राशीच्या व्यक्ती व्यवहारात फार पॉझिटिव्ह असतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship Tipsरिलेशनशिप