(Image Credit : Herald Sun)
आई होण्याचं योग्य वय काय असतं हे तुम्हाला माहीत आहे का? सामान्यपणे लग्न झाल्यावर एका वर्षाने किंवा २ वर्षांनी अनेक कपल्स बाळाचं प्लॅनिंग करतात. योग्य वय वगैरे असा विचार फार कुणी करताना दिसत नाही. पण डेन्मार्कमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये महिलांचं आई होण्याचं योग्य वय सांगण्यात आलं आहे. या रिसर्चमध्ये हे सुद्धा सांगण्यात आलं आहे की, कोणत्या वयात महिला आई झाल्यास त्याचं बाल अधिक हुशार होतं.
या रिसर्चमध्ये महिलांचं आई होण्याचं योग्य वय हे ३० वर्षे सांगण्यात आलं आहे. रिसर्चनुसार, ३० वयात महिला आई झाल्यास त्यांना यूट्रसच्या कॅन्सरचा धोका कमी असतो. या वयापर्यंत महिला पूर्णपणे सेटल झालेल्या असतात. त्यासोबतच हे एक असं वय आहे, ज्यात महिला मानसिक रूपाने बाळाला जन्म देण्यासाठी तयार झालेल्या असतात.
रिसर्चनुसार, महिला बाळाला जन्म देताना जर मानसिक रूपाने फिट असेल तर बाळही फिट आणि हुशार जन्माला येतं. अशात बाळाला जन्म देताना महिलेचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहणं फार गरजेचं आहे. जर महिलेचं आरोग्य चांगलं नसेल तर याचा नकारात्मक प्रभाव बाळाच्या आरोग्यावरही पडतो.
हा रिसर्च डेन्मार्कच्या आरहूस विश्वविद्यालयात करण्यात आला. रिसर्चमध्ये ४, ७४१ महिलांचा समावेश करण्यात आला होता. डेन्मार्कमध्ये महिलांचं बाळाला जन्म देण्याचं सरासरी वय हे ३०.५ आहे. इंग्लंड आणि वेल्समध्येही महिलांचं आई होण्याचं सरासरी वय हे ३० आहे. या रिसर्चमागे असाही तर्क आहे की, ३० वर्षापर्यंत तरूणी परिपक्व होतात. त्या या वयापर्यंत शिक्षित आणि आर्थिक रूपाने स्वतंत्र होतात. अशात त्यांना बाळाचा सांभाळ करण्यात अडचण येत नाही.