(Image Credit : Happy Family Solutions)
आज मानसिक रूपाने हेल्दी राहणे परिवाराच्या आनंदासाठी फार महत्त्वाचं आहे. दिवसभर जेव्हा तुम्ही काम करून तणावाला दूर करून घरी परतता तेव्हा तुम्हाला सुखाचे काही क्षण हवे असतात. आजच्या लाइफस्टाइलमध्ये अनेक लोक आपल्या परिवाराला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे एकमेकांप्रति नाराजी, राग, चिडचिड, भांडणं होतात. एक आनंद परिवार तेव्हाच होतो, जेव्हा परिवारातील सर्व सदस्य खूश असतील. परिवारातील एक व्यक्तीही तणावात असेल तर आनंद कमी होऊ लागतो. अशाच एक प्रश्न उभा राहतो की, परिवाराला खूश कसे ठेवावे? परिवाराला खूश ठेवण्याच्या काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सर्वांनी सोबत रहा
तुम्ही कितीत बिझी असाल तरी एकमेकांसाठी वेळ काढा, सोबत मजा-मस्ती करा. एकमेकांवर प्रेम करा. अलिकडे मोबाइलमुळे एकमेकातील बोलणं कमी झालंय. त्यामुळे बोला, संवाद साधा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा. याने सर्वांना आनंद मिळेल आणि सर्वांचं आरोग्यही चांगलं राहील.
मनातल्या गोष्टी शेअर करा
एकमेकांसोबत तुमच्या मनातील गोष्टी शेअर करा. मग त्या आनंदी असोत, गमतीदार असोत वा दु:खाच्या असोत. परिवारात काही पर्सनल नसतं, त्यामुळे एकमेकांशी शेअर करा. याने सर्वांनाच आनंद मिळेल आणि तुमच्यातील नातं घट्ट होईल.
एकत्र जेवण करा
एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढतं. आजकाल प्रत्येक घरात बघायला मिळतं की काही लोक डायनिंग रूममध्ये जेवण करतात, काही लोक बेडरूममध्ये तर काही हॉलमध्ये जवतात. सोबत जेवण केल्याने एकमेकांशी थोडं बोलण्याची संधी मिळते आणि जास्त धकतं सुद्धा.
सोबत खेळ खेळा
लहान मुलांच्या आरोग्यासाठी खेळणं फार महत्त्वाचं आहे. त्यांनी आजी-आजोबांसोबत खेळावं. लहान मुलांनी दिवसभर मोबाइल बघण्यापेक्षा घरातील लोकांसोबत गमती-जमती करण्यात वेळ घालवावा.
परिवाराला प्राथमिकता द्या
ऑफिस, मित्र या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण त्याहूनही महत्त्वाचा परिवार आहे. त्यामुळे परिवाराला प्राथमिकता द्यावी. त्यांच्यासोबत वेळ घालवा, कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करा. परिवारातील लोकांनी गृहीत धरू नका.
लहान मुलांना कामं शिकवा
असं केल्याने लहान मुले बिझी राहतील. त्यांना मोबाइल बघण्यासाठी वेळ मिळणार नाही. त्यासाठी त्यांना घरातील छोटी छोटी कामे शिकवा. त्यांच्यासोबत बसून ती कामे त्यांच्याकडून करून घ्याल तर त्यांनाही त्यात मजा येईल. याचा त्यांना भविष्यात फायदा होईलच.
राग-चिडचिड टाळा
काहीही असेल तरी सुद्धा हळू आवाजात बोला. मोठ्यांचा आदर करा. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण टाळा. स्थितीनुसार, तुम्हाला कुणासमोर झुकावं लागत असेल तर झुकण्यात काहीच गैर नाही. परिवाराचं हित महत्त्वाचं आहे.