शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

घरात लहान मुले असतील तर परफ्यूम आणि डिओड्रन्ट वापरताना घ्या काळजी, नाही तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 12:46 IST

आजच्या जमान्यात क्वचितच असं कुणी असेल जे डिओटड्रेंट किंवा परफ्यूमचा वापर करत नसतील. मग वय कोणतंही असो, महिला असो वा पुरूष असो सगळ्यांना असं वाटतं की, त्यांच्या शरीराचा चांगला सुंगध यावा.

(Image Credit : The List)

आजच्या जमान्यात क्वचितच असं कुणी असेल जे डिओटड्रेंट किंवा परफ्यूमचा वापर करत नसतील. मग वय कोणतंही असो, महिला असो वा पुरूष असो सगळ्यांना असं वाटतं की, त्यांच्या शरीराचा चांगला सुगंध यावा. अशात अनेकजण रोज घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरचे डिओड्रेंट आणि परफ्यूम वापरले जातात. 

बॉटलवर लिहिलेल्या निर्देशांचं पालन न केल्यास नुकसान

(Image Credit : Poison Control)

अनेकजण डिओ किंवा परफ्यूमचा वापर करताना बॉटलवर देण्यात आलेल्या निर्देशांचं पालन कुणीच करत नाही. जे महागात पडू शकतं. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असं सिद्ध झालं की, लहान मुलांना होणाऱ्या जखमांमध्ये १२.७ टक्के जखमा पर्सनल केअर प्रॉडक्ट्समुळे लागतात. ज्यात डिओड्रेंट आणि परफ्यूमचाही समावेश आहे. याप्रकारच्या वस्तू लहान मुलांसाठी फार नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे यांचा वापर करताना आई-वडिलांनी फार काळजी घेतली पाहिजे.

या वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवा

परफ्यूम आणि डिओड्रेंटसारख्या वस्तू लहान मुलांपासून दूरच ठेवल्या पाहिजेत. कारण लहान मुलं चुकून डोळ्यांवर स्प्रे करू शकतात, त्यांच्या नाकात, कानात आणि तोंडातही जाऊ शकतं. असं होणं त्यांच्यासाठी फारच हानिकारक ठरू शकतं. इतकेच नाही तर घरात जर जास्त लहान मुले-मुली असतील तर पालकांनी फार जास्त काळजी घ्यावी. अशा वस्तू त्यांच्यापासून दूर ठेवाव्या.

लहान मुलांच्या आरोग्याला समस्या

जर तुमच्या घरात १३ ते १७ वयोगटातील मुलं असतील तर त्यांना मित्रांच्या प्रेशरमुळे होणाऱ्या वेगळ्या समस्या होऊ शकतात. मोठी मुलांनाही चांगला सुगंध येतो म्हणून या गोष्टी ट्राय करायच्या असतात. अशात कमी वयातच डिओड्रेंट किंवा परफ्यूमचा अधिक वापर केल्याने लहान मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. घरातील मोठी लोकंच जर बॉटलवरील सूचना वाचत नाही तर मुलंच कुठून वाचतील. त्यामुळे त्यांना स्कीन अ‍ॅलर्जी, रिअ‍ॅक्शन, अस्थमा आणि श्वास घेण्याची समस्या होऊ शकते.

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपHealthआरोग्य