(Image Credit : psychlopaedia.org)
अभ्यासात मन न लागणे, खेळात भाग न घेणे, सतत भांडणं करणे, ओरडणे आणि हट्टीपणा करणे या गोष्टी लहान मुलांच्या बिघडण्याचे संकेत नाही तर त्यांना असलेल्या एका आजाराचा संकेत आहेत. जास्तकरून शहरी भागातील लहान मुलांमध्ये ही समस्या बघायला मिळते. याला सायकोटिक डिप्रेशन असं म्हटलं जातं. आई-वडिलांचा पुरेसा वेळ न मिळाल्याने ते या मानसिक समस्येचे शिकार होत आहेत.
काय आहे सायकोटिक डिप्रेशन?
सायकोटिक डिप्रेशन एक गंभीर डिप्रेशन स्थिती असून ज्यात तुम्हाला अशी भावना किंवा आवाज ऐकू येतो. जसे की, तुम्ही कोणत्याही कामाचे नाही किंवा अयशस्वी आहात. या डिप्रेशनमध्ये काही लोकांना वाटू शकतं की, ते त्यांच्या विचारांना ऐकू शकतात.
सायकोटिक डिप्रेशनची लक्षणे
लहान मुलांमध्ये सतत उदासी किंवा निराशा दिसत असेल तर वेळीच सावध व्हा. तसेच चिडचिड करणे, विनाकारण दु:खी राहणे, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणे, व्यवहारात बदल, खाण्या-पिणं टाळणे, खेळण्यास रस नसणे, नकारात्मक विचार करणे आणि अस्वस्थ राहणे ही प्रमुख लक्षणे सांगता येतील. त्यासोबतच समान वयाच्या मुलांबाबत ईर्ष्या करणे हेही लक्षण आहे.
काय आहे कारण?
आधुनिक जीवनशैलीमध्ये जास्तीत जास्त लहान मुलं-मुली सायकोटिक डिप्रेशनचे शिकार होत आहेत. लहान मुलांमध्ये सायकोटिक डिप्रेशनमुळे एकटेपणा, लहान मुलांना समजून घेण्यात चूक करणे, त्यांच्यावर अधिक चिडणे आणि त्यांच्यावर तुमच्या अपेक्षांचं ओझं टाकणे. आजकाल जास्तीत जास्त कपल्स नोकरी करतात. ते सकाळी आपल्या कामावर निघून जातात. अशात लहान मुलं घरात एकटे राहतात आणि त्यांच्यावर घराकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारीही टाकली जाते.
अभ्यासाचाही येऊ शकतो तणाव
काही लहान मुलांमध्ये तणावाचं मुख्य कारण अभ्यास हे बघायला मिळतं. होमवर्क पूर्ण न केल्याने किंवा नंबर्स कमी मिळाल्याने ते सतत चिंतेत राहतात. तसेच होमवर्क पूर्ण न केल्याने आई-वडिलांकडून ओरडाही खावा लागतो. शाळेत शिक्षकांचा ओरडा खावा लागतो.
होऊ शकतात गंभीर परिणाम
कमी बोलणे, उदासी आणि चिडचिडपणा फार जास्त काळ त्यांच्यात राहिला तर लहान मुलांवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे लहान मुलं नकारात्मक विचारांकडे वळू लागतात. याने त्यांचा आत्मविश्वास देखील कमी होतो. तसेच अभ्यास, खेळणे या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा परफॉर्मन्सही कमी होऊ लागतो.
कसा कराल बचाव?
जर लहान मुलांमध्ये अशाप्रकारची लक्षणे दिसली तर वेळीच सावध व्हा. त्यांच्यावर अभ्यासाचा इतका दबाव टाकू नका की, त्यांचा उत्साह नष्ट होईल. अभ्यासासोबतच त्यांना आवडणाऱ्या अॅक्टिविटींमध्येही त्यांना सहभागी करा. त्यांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींना नाकारू नका. त्यांचं ऐकून घ्या आणि त्यांना मार्गदर्शन करा. मुलांसाठी वेळ कसा काढता येईल याचं दोघांनीही प्लॅनिंग करा. वेळ पडल्यास चाइल्ड काउन्सेलर किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.