शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमध्ये एक्ससोबत सतत आमनासामना होतो? अशी सांभाळा इमेज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 14:52 IST

जर तुमची एक्स तुमच्या ऑफिसमध्येच काम करत असेल आणि सतत तिला समोरं जावं लागत असेल तर अशावेळी व्यवस्थित काम करणं किंवा वागणं जरा कठीण असतं.

प्रोफेशनल लाइफमध्ये तुमचं वागणं आणि तुमची इमेज खूप महत्त्वाची असते.  अनेकदा ऑफिसमध्ये काही वाद झाल्यावर अशी परिस्थिती कशी हाताळायची याचाही विचार करावा लागतो. जर तुमची एक्स तुमच्या ऑफिसमध्येच काम करत असेल आणि सतत तिला समोरं जावं लागत असेल तर अशावेळी व्यवस्थित काम करणं किंवा वागणं जरा कठीण असतं. अशावेळी ऑफिसमधील तुमचं नेमकं काय सुरु आहे यावरही लक्ष ठेवून असतात. त्यामुळे अशी परिस्थिती कशी हाताळायची याच्या काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वागणूक नॉर्मल ठेवा

ऑफिसमध्ये जर तुम्हाला आपल्या एक्सला सतत फेस करावं लागत असेल, तर तुमचं वागणं सामान्य ठेवा. कोणत्याही प्रकारची ओव्हर रिअॅक्शन तुमची इमेच खराब करु शकते. अशावेळी स्वत:वर कंट्रोल ठेवणे कठीण असते, पण प्रयत्न केला तर सगळं ठिक होतं. 

खाजगी जीवन शेअर करु नका

आपल्या एक्ससोबत काम करत असताना जर तुम्ही केवळ कामासंबंधीच बोलला तर जास्त बरं राहिल. तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी एक्ससोबत शेअर करण्याचा प्रयत्न करु नका. असे केल्याने स्थिती आणखी बिघडू शकते. जर कुणी तुमच्याशी जुन्या गोष्टींवरु बोलण्यास सुरुवात करत असेल तर तुम्ही विषय बदलवू शकता.

जुन्या गोष्टी गंमतीत टाळा

अनेकदा असं होतं की, तुम्ही तुमच्या एक्ससोबत एकटे किंवा ग्रुपमध्ये बसले असता आणि अशात कुणीतरी जुन्या गोष्टीवरुन काहीतरी गंमत करतं. या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करुन ती गोष्ट हसण्यावर सोडू शकता. कोणत्याही प्रकारे विषय वाढेल असं काही बोलू नका.

खाजगी ते खाजगीच राहू द्या

ऑफिसमध्ये काम करता करता काही लोक आपल्या पर्सनल गोष्टीही शेअर करु लागतात. अशावेळी तुमची एक्सही ऑफिसमध्ये असेल तर ही चूक अजिबात करु नका. तुमच्या जुन्या नात्याबाबत ऑफिसमध्ये कुणाशीही काही बोलू नका. जर त्या नात्याबाबत तुम्ही काही विषय काढला तर त्यावरुन ऑफिसमध्ये तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते.

भावनांवर कंट्रोल ठेवा

असेही होऊ शकते की ऑफिसमध्ये काम करता करता अचानक एक्ससोबत घालवलेल्या खास आठवणी आठवतील. अशावेळी स्वत:ला सांभाळणे गरजेचे आहे. आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवा आणि कुणाही समोर स्वत:ला कमजोर पडू देऊ नका. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट