(Image Credit : www.smu.edu.sg)
ऑफिस एक असं ठिकाण असतं जिथे कुणाचं ना कुणाचं अफेअर असतंच. मात्र, ऑफिसमध्ये अफेअर करताना किंवा रोमॅंटिक रिलेशन ठेवताना काही गोष्टींची फारच काळजी घेणं गरजेचं असतं. कारण ऑफिसमध्ये रोमान्स करणं जेवढं एक्सायटींग असतं तेवढंच धोकादायकही असतं. काही लोकांसाठी हे एखाद्या मोटिवेटरसारखं काम करतं. तर काही लोकांसाठी हे नातं त्यांना उध्वस्त करणारं ठरतं. शेवटी हे दोन व्यक्ती या गोष्टींना कसं डील करतात यावर अवलंबून असतं. चला जाणून घेऊ काही आवश्यक गोष्टी....
प्रत्येक नाण्याला दोन बाजू
जर तुम्हाला ऑफिसमधील एखाद्या सहकाऱ्यासोबत बोलायला आवडत असेल, त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागत असेल किंवा त्या व्यक्तीसोबत डेटवर जायचं असेल तर काही गोष्टींची आधी विचार करा. कारण हे नातं तुमच्या इतर नात्यांवर आणि करिअरवर वाईट प्रभावही करू शकतं.
...तोपर्यंत काही वाईट नाही
ऑफिसमधील सहकाऱ्यासोबत रिलेशनमध्ये असणं तोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत दोघेही एकमेकांच्या भावनांचा सन्मान करतात. समोरच्या व्यक्तीने तुमचं प्रपोजल स्वीकारलं तर सगळं काही ठीक. पण जर होत नसेल तर समोरच्या व्यक्तीचा सन्मान तसाच कायम ठेवा. कोणत्याही प्रकारचा राग मनात ठेवू नका.
दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका
तुमचं प्रपोजल स्वीकारण्यासाठी सहकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. कारण याने ऑफिसमधील वातावरण बिघडू शकतं. सोबतच तुमच्या प्रतिमेला डाग लागू शकतो आणि याने तुमचं करिअर प्रभावित होऊ शकतं.
ऑफिस पॉलिसी आणि तुम्ही...
ऑफिसमधील सहकाऱ्यासोबत डेटिंग सुरू करण्याआधी हे तपासून घ्या की, तुमच्या ऑफिस पॉलिसीमध्ये अॅंटी-फ्रॅटर्नाइजिंग क्लॉज तर नाही ना. रिलेशनशिपबाबतचं असं पाऊल ऑफिसमध्ये तेव्हाच उचला जेव्हा तुम्हाला कन्फर्म असेल की, ऑफिसमधील नियम तुम्ही तोडत नाही आहात.
कठीण आहे पण करावं लागेल
तुमच्या पर्सनल रिलेशनचा प्रभाव तुमच्या कामावर पडू नये. यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही प्रोफेशनल वागावं. ऑफिस रोमान्समध्ये तेच लोक यशस्वी होऊ शकतात जे प्रोफेशनलिजमला व्यवस्थित हॅन्डल करू शकतात.
यासाठी तयार रहाच...
ज्या व्यक्तीसोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, ती व्यक्ती सतत तुमच्या जवळ असेल तर तुमचं कामावरील लक्ष भटकू शकतं. त्यामुळे या गोष्टीचीही काळजी घ्या की, कामावर परिणाम होऊ नये. तशी मानसिक तयारी करा.
हे तर फेस करावंच लागेल
रिलेशनशिप सुरू करण्याआधी याचा विचार करा की, ऑफिसमध्ये गॉसिप्स सुरू होतील. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही असं काही होणं रोखू शकाल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. तुमच्याबाबत लोकांना असंही काही ऐकायला मिळू शकतात, ज्या तुम्हालाही माहीत नसतील. यासाठीही तुम्हाला तयार रहावं लागेल.