(image credit-astrodeepam)
लव्ह मॅरेज असो अथवा अरेंज मॅरेज असो लग्नाच्या पहिल्या रात्री पार्टनरशी कसं बोलायचं आणि काय रिएक्ट करायचं हा मोठा प्रश्न असतो. लग्नानंतर नवीन जबाबदारी आणि नात्यांना सुरूवात होत असते. नातं टिकवण्यासाठी लग्नाची पहिली रात्र खूप महत्वाची असते. त्यामुळे पार्टनरशी थेट शरीरसंबंध ठेवण्यापेक्षा त्याआधी या टिप्स वापराल तर तुमतं नातं अधिक घट्ट होईल.
त्यामुळे पहिल्या रात्रीची सुरूवात चांगली असायला हवी. सिनेमात दाखवल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टीत घाई करून चालत नाही. काहीही करण्याआधी जर तुम्ही गप्पा मारून सुरूवात केली तर नात्यासाठी चागलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच टिप्स सांगणार आहोत. ज्या वाचून तुम्हाला नक्की कसं वागायला हवं याबद्दल कळेल.
एकमेकांची स्तुती करा
कोणत्याही गोष्टीची सुरूवात करण्याआधी एकमेकांची स्तुती कराल तर तुमचा पार्टनर सिक्युर फिल करेल. जर तुम्ही एकमेकांशी गप्पा माराल तर कंर्फर्टेबल वाटेल. जर तुम्ही एकमेकांशी बोलताना इन्जॉय करत असाल तर तुमचं बोलणं अधिक वेळ सुद्धा चालू शकतं.
लग्नाच्या बेस्ट मॉमेंटबद्दल विचारा
लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. अनेक महिने तयारी करावी लागते. अशावेळी लग्नातील अविस्मरणीय क्षणांबद्दल बोला. त्यामुळे पार्टनरला खूप चांगलं वाटेल.
एकमेकांना प्रेमाने कोणच्या नावाने हाक माराल
लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही एकमेकांना घरी कोणत्या नावाने हाक मारणार हे ठरवा. कारण अनेक कपल्स लग्न झाल्यानंतर घरच्यांसमोर पार्टनरला वेगळ्या नावाने हाक मारतात आणि एकांतात असल्यावर वेगळ्या नावाने हाक मारतात. तुम्ही जर अशापध्दतीने पार्टनरशी बोलाल तर खूप चांगलं वातावरण तयार होईल.
लग्न झाल्यानंतर कसं वाटत आहे हे विचारा
लग्न झाल्यानंतर मुलीचं घर आणि त्यासोबतच संपूर्ण विश्व बदलत असतं. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री लग्नाबद्दल मत विचारात घ्या. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला असं विचारलं तर तिला खूप सकारात्मक वाटण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-गर्लफ्रेंडच्या घरचे लग्नासाठी तयार होत नसतील तर गाडी अशी आणा रूळावर!)
बेड रुल्स तयार करा
लग्नानंतर सगळ्यांच्या आयुष्यात एक स्वतःची हक्काची असणारी व्यक्ती येत असते. त्यामुळे तुम्ही रोजचे बेडरुल्स तयार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी बेडरूममध्ये आल्यानंतर फोन साई़ड्ला ठेवून द्या. दिवसभराचे टेंशन आणि निगेटिव्हीटी संपूर्ण बेडरूमच्या बाहेर ठेवून मग पार्टनरला वेळ द्या. ( हे पण वाचा-लग्नाआधी जाणून घ्या कोणत्या राशीचे पुरूष असतात रोमँटिक आणि प्रामाणिक!)