8 गोष्टींचं काटेकोर नियोजन करा आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य आनंदी, स्वच्छंदी आणि अर्थपूर्ण जगा!
By Admin | Updated: June 14, 2017 19:01 IST2017-06-14T19:01:33+5:302017-06-14T19:01:33+5:30
निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं नियोजन करताना या 8 गोष्टींचा अवश्य विचार करा. आणि स्वत:चं आयुष्य स्वत:च्या मनाप्रमाणे जगा.

8 गोष्टींचं काटेकोर नियोजन करा आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य आनंदी, स्वच्छंदी आणि अर्थपूर्ण जगा!
- माधुरी पेठकर
‘नोकरी-व्यवसायातून निवृत्त होणं’ या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही नकारात्मकच आहे. नोकरी संपली, आता काय करायचं? काय उरलय आयुष्यात? असे उदासी आणणारे प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसतात. आणि यामुळे निवृत्तीनंतरचं आयुष्य अनेकजण फिकट, करड्या रंगात आणि उदास मूडमध्ये जगतात.
एरवी घरातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमाचं नियोजन आपण महिनाभर आधी करायला लागतो. पण निवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल अगदी निवृत्त होण्याची वेळ येवून ठेपल्यानंतरही अनेकांना विचार करण्याची फुरसत मिळत नाही. मग काय निवृत्तीनंतर येणारं रिकामेपण अनेकांना नकोनकोसं होवून जातं. वेळेचं, पैशाचं, पुढच्या आयुष्यातल्या जगण्याचं, आनंदी राहण्याचं, स्वत:ला गुंतवण्याचं अगदी कसलंच नियोजन नसल्यानं निवृत्तीनंतर निरस आयुष्य अनेकांच्या वाट्याला येतं.
खरंतर नोकरी व्यवसायातल्या निवृत्तीनंतर सर्व काही संपत नाही. उलट निवृत्ती ही संधी असते एक नवीन आयुष्य नवीन पध्दतीनं जगण्याची. एरवी नोकरी व्यवसायामुळे आपला स्वत:चा दिवस आपला असूनही स्वत:चा वाटत नाही. तो कामं आणि जबाबदाऱ्यांमुळे सतत घडयाळीच्या काट्यांशी बांधलेला असतो. निवृत्तीनंतर स्वत:च आयुष्य स्वत:च्या मर्जीप्रमाणं, आपल्या जोडीसारासोबत, कुटुंबासोबत आनंदानं जगण्याची संधी निवृत्तीनंतरचं आयुष्य देत असतं. या संधीचा फायदा जे जे घेतात त्यांना आयुष्यात समाधान म्हणजे नेमकं काय ते निवृत्तीच्या टप्प्यात कळतं. आनंदी आणि समाधानी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी नियोजनाची तेवढी गरज असते. निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं नियोजन करताना या 8 गोष्टींचा अवश्य विचार करा. आणि स्वत:चं आयुष्य स्वत:च्या मनाप्रमाणे जगा.
7) वेळेचं नियोजन करा- निवृत्तीनंतर आता काय अख्खा दिवस मोकळा, नेहेमीची कामं कितीही सावकाशीनं उरकली तरी चालतील असा विचार अनेक करतात. पण या सावकाशीतला आनंद खूपच कमी काळ टिकतो. या सावकाशीमुळेही आपलं आयुष्य निरर्थक वाटू शकतं. आपल्या घरातले इतर सर्व पळत असतात आणि आपण मात्र एकदमच निवांत राहतो याचंही नैराश्य येवू शकतं. शरीर आणि मन ताजं ठेवायचं असेल तर दिवसभराचा वेळ विशिष्ट कामांना ठरवून घ्यावा. वेळेचं हे नियोजन करताना संपूर्ण 24 तासांचं काटेकोर नियोजन न करता स्वत:च्या आवडी निवडींना, आपल्या मित्र मंडळींमध्ये मिसळायला, जोडीदारासोबत राहायला जास्तीत जास्त वेळ शिल्लक ठेवायला हवा हे लक्षात असू द्यावं. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात स्वत:साठीचा वेळ ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि हा वेळ सत्कारणी लागला तर आपल्याला आणि आपल्यासोबत इतरांनाही आनंद आणि समाधान नक्की मिळतं.
8) नातवंडांचं संगोपन- संपूर्ण नियोजनामध्ये हा पर्याय सर्वात शेवटी आहे. एरवी आता झालो निवृत्त म्हणून अनेकजणांवर बळजबरीनंच नातवंडांची जबाबदारी उचलावी लागते.खरंतर या जबाबदारीतही आनंद आहे. पण ही जबाबदारी ऐच्छिक हवी, लादलेली नसावी. निवृत्तीनंतरच्या आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ जर कोणाला नातवंडांना द्यायचा असेल तर ते जरूर देवू शकतात. मैत्रीच्या पातळीवर येवून नातवंडांचं संगोपन करण्याची उत्तम संधी या काळात मिळू शकते. नातवंडांच्या बालपणात आजी आजोबा आनंदाचे रंग भरू शकतात. निवृत्तीनंतरचं आयुष्य आजी आजोबांना ही संधी देतं.