शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

प्रेमात असलेल्या प्रत्येकाने रणवीर सिंहकडून या गोष्टी शिकायला हव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 13:09 IST

चांगला बॉयफ्रेन्ड कसं होता येईल याचा विचार काहीजण नक्कीच करत असतील. त्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टीही ट्राय करत असतील.

मुंबई : चांगला बॉयफ्रेन्ड कसं होता येईल याचा विचार काही तरुण नक्कीच करत असतील. त्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टीही ट्राय करत असतील. पण काही ते उमगतं आणि काहींना नाही. अशात तुमचं नातं अडचणीत येतं. अशावेळी चांगला बॉयफ्रेन्ड कसा असावा याचं ताजं उदाहरण बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचं देता येईल. तुम्ही म्हणाल कसं तर ते खालीलप्रमाणे सांगता येईल. 

1) तुम्ही आहात तसेच राहा

रणवीर सिंह हा अजिबात कधी बडेजाव करताना तुम्हाला दिसला नसेल. तो उगाच नाटकीय पद्धतीने वागत नाही. त्याला वाटतं तसं तो वागतो. स्पष्ट बोलतो. तो नेहमीच विचित्र कपड्यांमध्ये बघायला मिळतो. कोण काय म्हणेल याचं त्याला काहीही देणंघेणं नाही. तुम्ही आहात तसे वागणं तुमच्या गर्लफ्रेन्डला नक्कीच आवडेल. 

2) पार्टनरला नेहमी प्रोत्साहन द्या

आपल्या पार्टनरचा, तिच्या कामाचा, तिच्या निर्णयाचा सन्मान करणं हे सगळं रणवीर सिंह करत असतो. तो दीपिकाच्या घरच्यांना भेटतो, तिच्या मेहनतीची नेहमी प्रशंसा करतो. सोशल मीडियात छान छान फोटो शेअर करतो. अडचणी असो वा आनंदाचे क्षण तो तिच्यासोबत असतो. हा गुण तर प्रत्येक बॉयफ्रेन्डमध्ये असायला हवा. 

3) काहीही झालं तरी तिच्यासाठी वेळ काढा

रणवीर सिंह आणि दीपिका दोघेही आपल्या कामात किती बिझी असतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरीही ते आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून एकमेकांसोबत छान वेळ घालवतात. अनेकदा दोघे सुटयांमध्ये एकत्र फिरायला जातात, वेगवेगळ्या सोशल इव्हेंट्समध्ये एकत्र जातात. इतकेच नाहीतर दीपिका हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग करत असताना व्हॅलेंटाईन डे तिच्यासोबत साजरा करण्यासाठी तो कॅनडाला गेला होता.

4) मनसोक्त आयुष्य जगा

अनेकांप्रमाणे रणवीर सिंह यालाही मोठा स्ट्रगल करावा लागला. पण तो कधीही नाराज किंवा त्याच त्याच गोष्टी लोकांना सांगताना दिसत नाही. त्याला कठीण परिस्थितीतही कसं हसावं हे माहीत आहे. तो त्याच्या समोरील सगळ्याच गोष्टींना सकारात्मक पद्धतीने बघतो. हेही तुमच्या गर्लफ्रेन्डला नक्की आवडेल. 

5) स्वत: व्हा स्वत:चे शिल्पकार

हे काही वेगळं सांगायला नको की, रणवीर त्याच्या कामावर खूप प्रेम आहे. त्याला ते मनापासून आवडतं. त्यामुळेच आजच्या घडीला बी-टाऊनमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा या इंडस्ट्रीत कुणीही गॉडफादर नाहीये. तो स्वत:च्या मेहनतीने आज मोठा स्टार झाला आहे. अशा मुलाला डेट करणं किंवा त्याच्या प्रेमात पडणं कुणाला नाही आवडणार?

6) असुरक्षित वाटून घेऊ नका

दीपिका आणि तिचा आधीचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर यांच्याच चांगली मैत्री आहे. ब्रेकअप झाल्यानंतरही दोघांनी एकत्र काम केलंय, करताहेत. पण याचं वाईट किंवा याबाबत रणवीरला कधीही असुरक्षित वाटत नाही. ही गोष्टही तुमच्या गर्लफ्रेन्डला नक्कीच आवडणारीच असेल.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट