(image credit- the list)
रिलेशनशीपमध्ये असताना माझा पार्टनर माझ्याशी खूप लॉयल आहे असं जरी आपण म्हटलं तरी अनेक अशा गोष्टी आहेत. ज्या तुमचा पार्टनर तुम्हाला कधीच खरं सांगत नसतो. मग याच गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्याला पार्टनरबद्दल काही लपवून ठेवलेल्या गोष्टी सोशल मिडीया वरून अथवा फ्रेन्डसकडून कळाल्या तर मोठं भांडण सुद्धा होऊ शकतं. तुमच्या बाबतीत असं होईल असं तुम्हाला वाटत असेल तर अजिबात टेंशन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या गोष्टी प्रत्येक पार्टनर आपल्या गर्लफ्रेंडला नेहमी खोटं सांगतात.
वय
प्रत्येकाच्या आयुष्यात वय हा खूप महत्वाचा फॅक्टर असतो. कारण अनेकदा मुली विचार करत असतात की त्यांचा पार्टनर त्यांच्यापेक्षा वयाने जास्त मोठा असू नये. पण अनेक मुलं ही दिसण्यात येत नसले तरी वयाने मोठी असतात. त्यामुळे मुलीला आपल्या आयुष्यातून गमावण्याच्या भीतीने आपलं वय लपवत असतात.
पैसे
रिसर्चनुसार अनेक नाती ही पैश्यांमुळेत तुटत असतात. तसं पहायला गेलं तर महिला सुद्धा स्वतःजवळ असलेल्या पैश्यांबाबत मुलांना खरं सांगत नाहीत. पण मुलं आपल्या खर्चाबाबत नेहमी गुप्तता पाळत असतात. कारण अनेक मुलाना दारू पिण्याची, सिगारेटची सवय असते. या गोष्टींवर केल्या जात असलेल्या खर्चाबाबत ते आपल्या पार्टनरला खरं सांगायला संकोच करतात. तसंच अनेकांना आपला पगार इतरांच्या तुलनेत कमी वाटत असतो. त्यामुळे आपल्या पगाराची किंमत लपवून ठेवण्याची शक्यता असते.
आवडी निवडीबद्दल खोटं सांगणे
अनेकदा मुलं आपल्या गर्लफ्रेन्डला त्यांना आवडत असलेल्या गोष्टींबद्ल खरं सांगत नाहीत. त्यामुळे हीच गोष्ट ताण तणावाचं आणि भांडणाचं कारण ठरू शकते. जसं की काही मुलांना पॉर्न बघायला आवडतं, काहीजणांना स्मोकिंग करायला आवडतं. पण असं जर खरं पार्टनरला सांगितलं तर भांडण होण्याची शक्यता असते त्यामुळे पार्टनरला खोट्या आवडी निवडी सांगितल्या जातात.
एक्सबद्दल लपवणे
अनेकदा मुलं आणि मुली आपल्या जुन्या नात्याबद्दल किंवा एक्सबद्दस मुलींना सांगत नाही. कारण अनेकदा आधीचं नातं तुटण्यामागे स्वतःची चुक सुद्धा असू शकते. म्हणून आधीच्या ब्रेकअपचं खोटं कारण सांगितलं जातं. पण जर तुम्ही सिरीयस रिलेशनशीपमध्ये असाल तर एक्सबद्दल खरं सांगणचं उत्तम ठरू शकेल. तसंच अनेकदा मुलं आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खूपच संकोच करतात. स्वतःला काय वाटतय या बाबत व्यक्त होत नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते.