शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

मुलांचे निर्णय ते स्वत:च घेतात की तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 17:26 IST

मुलांचा कल ओळखून त्याला थोडी हवा द्या आणि मग पाहा..

ठळक मुद्देमुलांना त्यांचा निर्णय स्वत:च घेऊ द्या.त्यातल्या अडथळ्यांची जाणीव त्याला करुन दिली तर तो अधिक जबाबदारीनं आपला निर्णय घईल.त्यासाठीची संधी मात्र वेळोवेळी त्याला आवर्जुन उपलब्ध करून द्या.

- मयूर पठाडेबºयाचदा आपण काय करतो? आपल्या मुलाला काय हवं, काय नको, त्याच्यासाठी काय चांगलं, काय वाईट, या सगळ्या गोष्टींचा निर्णय आपण स्वत:च घेतो. मुलांना काय कळतं, असंच आपल्याला वाटत असतं. त्यामुळे मूल कितीही मोठं झालं तरी त्याच्यावतीनं आपणच निर्णय घेत असतो. आपले निर्णय त्याच्यावर थोपत असतो.आपल्याला जसं हवं, तसंच त्यानं बनलं पाहिजे, मुलानं डॉक्टर बनावं, इंजिनिअर बनावं असं आपल्या मनानं सुरुवातीलाच ठरवलेलं असतं, त्या चक्रात मग आपण त्याला ढकलतो आणि त्याच्याकडून त्यासाठी आवश्यक असणाºया गोष्टी जोरजबरदस्तीनं करवून घेतो.पण कधी विचारलंय आपल्या मुलाला, अरे तुला खरंच काय करायचंय, कोणत्या गोष्टीत तुला इंटरेस्ट आहे?.. बºयाचदा मुलांचा इंटरेस्ट, त्यांचा कल कुठे आहे, हे आपल्याला दिसतही असतं, पण आपण अगोदरच झापडं लावलेली असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे दुहेरी नुकसान होतं. मुलाला जे हवं ते त्याला करता येत नाही, त्याच्या ज्या क्षमता उच्च दर्जाच्या असतात, ते सोडून दुसरंच काही करण्यासाठी आपण त्याला भाग पाडतो. असं करण्यानं ना त्याला फारसं पुढे जाता येत, ना आपल्या स्वप्नांची पूर्तता होत..मुलांना त्यांचा निर्णय स्वत:च घेऊ द्या. त्यातल्या अडथळ्यांची भले त्याला जाणीव करून द्या.. या वाटेवर कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, कोणती आव्हानं आहेत, हे त्याला कळलं तर तो अधिक जबाबदारीनं आपला निर्णय घईल, पण आपल्या आवडीची गोष्ट केल्यामुळे त्याच्यात जी ऊर्जा निर्माण होईल, आपण ‘पॉवरफुल’ असल्याचा जो एक आत्मविश्वास त्याच्यात निर्माण होईल, तो कोणत्याच गोष्टीनं येणार नाही.त्यामुळे आपल्या जबाबदारीचं तर भान त्याला येईलच, शिवाय परिणामांची जबाबदारी घेणं हीदेखील आपलीच जबाबदारी आहे, हे त्याला कळेल.त्यासाठीची संधी मात्र वेळोवेळी त्याला आवर्जुन उपलब्ध करून द्या.मुलांमधला इंटरेस्ट ओळखून, त्यांचा कल पाहून त्याला थोडी हवा द्या आणि मग पाहा, मूल कुठे जातं ते..