शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

आई आहात? मग स्वत:ला मदर्स डेचं ‘हे’ गिफ्ट द्या!

By admin | Updated: May 12, 2017 17:50 IST

आईपणाचा जगायचं असेल तर आनंदाची ही भेट स्वतः ला द्या!

- नेहा चढ्ढाआई होण्यापूर्वीच्या आपण, आणि आजच्या आपण अशी तुलना केली तर काय दिसतं? जगभरातल्या तमाम आया एकच गोष्ट सांगतात, आई होण्यापूर्वी खाण्यापिण्याचं, भटकण्याचंच नाही तर निदान रात्री शांत झोपण्याचं आणि सुटीच्या दिवशीही काहीही न करता दुपारी मस्त झोप काढण्याचं स्वातंत्र्य होतं. आता ते नाही. एक क्षण फुरसत मिळत नाही. फटीग येतो, चिडचिड होते. रडू येतं अनेकदा. त्यात नोकरी करणारी आई असेल तर मग काय दिवसाचे २४ तास कमी पडतात. एकीकडे आपल्या आई असण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे आपल्याला आतून छळणारं औदासिन्य, त्याचं करायचं काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं एक चांगलं निमित्त आहे, रविवारी येणारा मदर्स डे. त्या दिनानिमित्त एक गिफ्ट द्या स्वत:ला आणि आपलं आईपण एन्जॉय करताना जरा रिलॅक्सही करा. आई असलो, तरी रिलॅक्स होणं यात काही चूक नाही.तर मग करता काय येईल. किमान या ५ गोष्टी रोज करा. आणि तुम्हाला स्वत:तच आनंदी बदल नक्की जाणवू लागतील.

 

१) पोटभर जेवाआता यात काय नवीन सांगताय असं तुम्हाला वाटू शकतंच. पण बहुसंख्य आया पोटभर जेवतच नाहीत. मुलांच्या ताटात उरलेलं कसंबसं बकाबका खातात. नाहीतर अन्न उरु नये म्हणून स्वत:च्या पोटात ढकलतात. कामं पडलेली असतात म्हणून धावपळीत जेवतात. सगळ्यांना वाढली आणि स्वत:ला भाजी उरलीच नाही म्हणून लोणचं पोळी खातात. असं कशाला करायचं? आपणही पोटभर जेवावं. शिस्तीत वाढून घ्यावं. शांतपणे जेवावं. ते निदान १० मिनिटं तरी आपलेच. दुसरं महत्वाचं, जाहिरातींकडे दुर्लक्ष करा, त्या सांगतात म्हणून बारीक होवू नका. त्यापेक्षा चांगलंचुंगलं खा आणि चवीढवीचा स्वाद घ्या. उपासमार थांबवा स्वत:ची.२) पाणी प्याहे पुन्हा अत्यंत सामान्य. पण विचारा स्वत:ला तुम्ही पाणी पिताय का? किती पिता?उत्तर नाही देता येणार? अनेक अभ्यास सांगतात की, बायका पाणीच पित नाहीत पुरेसं. डी-हायड्रेट असतात. त्यानं त्यांना थकवा येतो. चिडचिड होते. त्यामुळे आपण भरपूर पाणी पितोय ना, याकडे लक्ष द्या.३) ३ मिनिटं उन्हात जा..वेळच मिळत नाही हे कारण कितीही खरं असलं तरी त्याचा खरा अर्थ एवढाच की स्वत:साठी वेळ मिळत नाही. त्यामुळे फक्त १० मिनिटं रोज सकाळी लवकर स्वत:साठी काढा, चालून या. जमल्यास ३ मिनिटं उन्हात उभ्या रहा. सूर्यप्रकाशात जा, व्हीटॅमिन डी मिळत नाही म्हणून कॅल्शिअम कमी म्हणून मग ऐन तिशीत अनेकींची हाडं दुखायला लागतात. ते टाळा.४) झोपा किमान ६ तासलहान मूल असलं की झोपेचा प्रश्न असतोच. पण तरीही प्रयत्नपूर्वक ६ तास झोप मिळायलाच हवी. ती ही गाढ. जमल्यास एखादी सिरीअल कमी पहा. व्हॉट्सअ‍ॅप झोपण्यापूर्वी बंद करा. आणि आपल्याला ६ तास गाढ झोप मिळेल असं पहा. कारण शांत झोप न मिळाल्यानंही मानसिक त्रास, चिडचिड यातह पित्त, पचनाचे विकार सुरु होतात.५) एक दिवस आवडीचाआठवड्यातून एकदा जे स्वत:ला आवडेल ते करा. स्वत:च्या आवडीचं एकच गाणं ऐकणं, ते स्वत:च्या आवडीची भाजी करणं, ते आवडीची साडी नेसणं किंवा काहीही जे स्वत:ला आवडेल ते करा. लोक मला गृहित धरतात अशी तक्रार करण्यापूर्वी स्वत:ला गृहित धरणं बंद करा. आणि स्वत:साठी, स्वत:वर प्रेम करत एखादी गोष्ट करा. त्यानं जो आत्मविश्वास मिळेल त्यानं मोठी मजल मारता येवू शकेल.