शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताय? वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 13:50 IST

सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया साइट्सचा वापर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. त्यावर आपले फोटो, व्हिडीओ सर्रास आपण शेअर करतो.

सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया साइट्सचा वापर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. त्यावर आपले फोटो, व्हिडीओ सर्रास आपण शेअर करतो. अनेकदा तर आपल्या लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओही आपण फेसबुकवर सर्रास शेअर करतो. पण एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, आपल्या लहान मुलांची माहिती सोशल मीडियावर शेअर करणं हे फार घातक ठरू शकतं. 

ग्लोबल सायबर सिक्युरिटी फर्म McAfee ने काही दिवसांपूर्वी एक सर्वे केला. यातून असा खुलासा करण्यात आला की, भारतातील अनेक आई-वडील आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

या संशोधनाला 'द एज ऑफ कंसेन्ट' असं नाव देण्यात आलं आहे. सर्वेमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, भारतातील जवळपास 40.5% पालक दररोज आपल्या मुलाचा एकतरी फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. उर्वरित 36% पालक आठवड्यातून एकदा तरी असं करतात. 

हैराण करणारी गोष्ट म्हणजे 76% पालकांना या गोष्टीची जाणीव आहे की, त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने त्यांना नुकसान पोहोचू शकतं. पण तरिसुद्धा ते असं करणं थांबवत नाहीत. हा प्रकार मोठ्या शहरांमध्ये फार दिसून येतो. या संदर्भात मुंबईमधील काही पालकांशी संवाद साधण्यात आला 66.5% पालकांचं असं म्हणणं आहे की, त्यांना आपल्या मुलांचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याआधी कोणत्यातरी तिसऱ्या व्यक्तिचा सल्ला घेणं बंधनकारक आहे. मुंबई आणि दिल्ली फोटो शेअर करण्यामध्ये दुसऱ्या नंबरवर आहेत तर बंगळूरु तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

सर्वेमध्ये सहभागी असलेल्या 67% पालकांनी ही गोष्ट मान्य केली की, स्कूल यूनिफॉर्ममध्ये मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यामध्ये फार धोका आहे. यामुळे मुलांबाबत माहिती मिळण्यास मदत होते. या सर्वेमधून आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, मुलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यामध्ये आईपेक्षा वडिलांचं प्रमाण अधिक आहे. 

याबाबत McAfee च्या संशोधकांनी सांगितले की, जेव्हाही तुम्ही फोटो पोस्ट करता त्यावेळी जास्तीत जास्त लोकं सोशल मीडिया यूजर्सचे लोकेशन ट्रेस करू लागतात. त्यामुळे नेहमी फोटो पोस्ट करताना आपलं लोकेशन ऑफ करण्याची काळजी घ्या. त्याचबरोबर आपल्या मुलांचे फोटो पोस्ट करताना आपल्या मित्रमंडळींसोबत किंवा नातेवाईकंसोबच शेअर करा. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप