कुणाचीही लव्हस्टोरी भविष्यात कशी असेल हे सांगता येत नसतं. अनेक गोष्टी असतात ज्यांनी नातं मजबूत होत असतं. यात पैसा आणि शारीरिक आकर्षण महत्त्वाची भूमिका बजावतात. पण नातं मजबूत करण्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकमेकांचा ताळमेळ. पैसे आणि आकर्षणासारखं याचं मोजमाप करणं कठीण आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही प्रश्न. या प्रश्नांवरून तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुमच्यातील ताळमेळ कसा आहे आणि नातं पुढे नेण्यासाठी कोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे.
रिकामा वेळ कसा घालवता?
तुम्हाला प्रश्न पडेल की, रिकाम्या वेळेचा आणि दोघांमधील ताळमेळ याचा काय संबंध? संबंध आहे. विचार करा की, जर तुमच्या पार्टनरला घरी राहणे पसंत आहे आणि तुम्हाला रिकाम्या वेळेत बाहेर फिरायला जाणे आवडतं. मग काय तुम्ही त्याच्यासाठी घरी राहण्याची सवय लावून घ्याल, किंवा त्याला बाहेर चलण्यासाठी तयार कराल? लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये याला फार महत्त्व आहे.
नुकतंच तुम्ही काय वाचलं?
एखाद्या व्यक्तीची वाचण्याची सवय त्याच्या बौद्धीक स्तराबाबत सांगत असते. तज्ज्ञांचं मत आहे की, नेहमीच आपण सामान्य बौद्धीक स्तर असलेल्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतो. दोघांचे विचार मिळते-जुळते असतील तर नातं जास्त काळ चालू शकतं. पण कधी कधी विरोधी विचारांची लोकंही एकत्र फार काळ राहतात.
देवाबाबत काय विचार करता?
देव किंवा एखाद्या सर्वोच्च सत्तेबाबत व्यक्तीचे विचार त्याच्या व्यक्तिमत्वाचा मुख्य भाग असतात. आम्ही हे नाही म्हणत आहोत की, धर्माच्या आधारावर कुणाला नाकारा किंवा स्विकारा. पण या विषयावरील आपले विचार आपल्या उदारता आणि दुसऱ्यांचा स्विकार करण्याच्या क्षमतेबाबत सांगते.
लॉटरी लागली तर काय कराल?
प्रेम हे आंधळं असतं, प्रेमात लोक शाही थाटही सोडून जातात....हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरी सुद्धा पैसे जीवनाचं एक मुख्य वास्तव आहे. म्हणजे तुमचा पार्टनर फार खर्च करतो किंवा फार कंजूस आहे किंवा भविष्यासाठी पैसे वाचवतो किंवा आज एन्जॉय करतो. या सर्व गोष्टींवरून तुम्हाला तुमच्या भविष्याची एक झलक बघायला मिळते.
प्रेमात मिळालेल्या दग्यातून काय शिकले?
प्रेम, फसवणूक, दगा हे शब्द काही लोकांसाठी फार महत्त्वाचे असतात. कुणी किस करण्याला दगा समजतात तर कुणी याला सामान्य शिष्टाचार समजतात. मग यावर तुमचे आणि तुमच्या पार्टनरचे विचार जुळतात की, नाही हे बघा.
कोणत्या गोष्टीने रोमान्स जागा होतो?
रोमान्स आणि सेक्शुअल अॅक्टिवनेस याबाबतही रिलेशनशिपमध्ये सामंजस्य महत्त्वाचं असतं. या प्रश्वावर तुम्हाला हे कळेल की, तुमचा तुमच्या पार्टनरसोबत कोणता आकडा राहणार...छत्तीसचा तर नाहीये ना?
काय महत्त्वाचं, काम की परिवार?
हा एक फार विचित्र प्रश्न आहे. या प्रश्नावर जे उत्तर मिळेल त्यावर हे ठरेल की, घर आणि परिवार यात तुमचा पार्टनर कसा ताळमेळ बसवतो. येणाऱ्या काळात ही मोठी समस्या असणार आहे.