(Image credit -thenorthernecho.cok)तुम्ही तुमच्या जोडीदाराने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवता का? जर ठेवत असाल तर त्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही असा प्रश्न तुम्हाला पडायला हवा. कोणतंही नातं टिकण्यासाठी विश्वास महत्त्वाचा असतो. विश्वासाच्या आधारावर नातं टिकून असते. विश्वासाचा अभाव नात्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे विश्वासाचा भक्कम पाया उभारण्यासाठी दोन्ही कडून सारखेच प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांवर भरवसा ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया, पार्टनरच्या कोणत्या गोष्टींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेऊ शकता.
(Image credit-introvertdear)
१) अनेकदा जोडीदार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या लहान लहान गोष्टी सांगतो, ऑफिसमधील किंवा घरातील व्यक्तींशी संबंधीत गोष़्टी शेअर करत असतो. कारण तुम्ही जवळची असता अशावेळी तुम्ही तुमच्या जो़डीदारावर विश्वास ठेवू शकता.
२) कु़टुंबातील किंवा कामासंबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी तुमचा जोडीदार तुमचे मत विचारात घेत असेल तर त्याला तुमच्या निर्णयशक्तीवर विश्वास आहे. त्यामुळे असा प्रसंग आल्यास जोडीदाराला खोटं न ठरवता समजून घ्या.
४) आपल्या जोडीदारावर सतत संशय घेऊ नका, त्याला त्याची स्पेस दिलीत तर नातं अधिक घट्ट राहील. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये सतत वाद होत असतील तर एका कालावधीनंतर त्या व्यक्तीबद्दलच्या भावना संपतात. तुम्ही त्या नात्यावर कितीही विश्वास ठेवत असाल तरीही तुमच्यातील प्रेम संपलेलं असेल तर असं नातं फार काळ टिकू शकत नाही.
५)ओव्हर पझेसिव्ह हा नात्यासाठी धोक्याचा असतो. आपल्या जोडीदाराची अतिकाळजी करणं किंवा सतत त्याचाच विचार करणं यामुळे तुमचं नातं धोक्यात येतं. त्यामुळे तुमच्या मध्ये लहान लहान कारणांनी वाद सुरू होतात.
(Image credit- hackspirit.com)
६) जर तुमच्याकडून एखादी चूक झाली आणि हे तुमच्या पार्टनरला माहीत असताना देखील त्याने याकडे दुर्लक्ष केले, याचा अर्थ असा की तुमचा जोडीदार म्हाला समजून घेतोय.