शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सर्वसाधारण सभेनंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 6:46 PM

Ratnagiri ZpNews- रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर राजीनामे देणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच जिल्हा नियोजन समितीवर असलेल्या सदस्यांना यावेळीही अध्यक्ष, सभापतिपदापासून दूर राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेनंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामेशिवसेनेचे ३९, राष्ट्रवादीचे १५ असे पक्षीय बलाबल

रत्नागिरी : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर राजीनामे देणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच जिल्हा नियोजन समितीवर असलेल्या सदस्यांना यावेळीही अध्यक्ष, सभापतिपदापासून दूर राहावे लागणार आहे.पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाच्या मुदतीप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती यांना राजीनामे देण्याचे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. मात्र, या सर्व पदाधिकाऱ्यांची मुदत मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे ३९, राष्ट्रवादीचे १५ आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे.

दरम्यान, त्यामध्ये शिवसेनेच्या १६ सदस्य जिल्हा नियोजन समिती आहेत. त्यामुळे उर्वरित २३ जणांना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतिपदे मिळणार हे निश्चित होते. त्यापैकी महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे आणि समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव या जिल्हा नियोजन समितीवर आहेत. नियोजन समितीचे सदस्य पद राष्ट्रवादीकडे जाऊ नये, यासाठी ऋतुजा जाधव यांना शिवसेनेकडून संधी देण्यात आली होती.दरम्यान, चंद्रकांत मणचेकर, पर्शुराम कदम, पूजा नामे, स्वप्नाली पाटणे, रेश्मा झगडे, मानसी साळवी आणि मंदा शिवलकर हे नियोजन समितीचे सदस्य नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेतील पदे मिळणार हे निश्चित आहे. मात्र, शिवसेनेमध्ये मानसी साळवी आणि मंदा शिवलकर यांच्याबद्दल नाराजी असल्याने त्यांना सभापतिपदापासून दूर ठेवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.कौन बनेगा अध्यक्षअध्यक्षपदासाठी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू व बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती अण्णा कदम यांच्यासह आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विक्रांत जाधव यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, विक्रांत जाधव यांचे नाव चर्चेत असले तरी ते अजूनही राष्ट्रवादीमध्येच आहेत. राज्यात आघाडी सरकार असल्याने त्यांना संधी मिळू शकते. मात्र काही जणांचा त्याला विरोध आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी