शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद : जानेवारींपर्यंत बांधकाम करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 14:33 IST

पायाभूत सर्व्हेक्षण २०१२ मधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या ७१२२ कुटुंबांनी ३१ जानेवारी, २०१९ पर्यंत शौचालय बांधावे अन्यथा या कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : जानेवारींपर्यंत बांधकाम करण्याच्या सूचना७१२२ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नाहीत

रत्नागिरी : पायाभूत सर्व्हेक्षण २०१२ मधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या ७१२२ कुटुंबांनी ३१ जानेवारी, २०१९ पर्यंत शौचालय बांधावे अन्यथा या कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजाणी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु आहे. आपला जिल्हा सांघिक प्रयत्नातून व सहकार्यातून डिसेंबर २०१६ मध्ये हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला होता. शासनाच्या नवीन सुधारित निकषानुसार घर तेथे शौचालय या संकल्पनेस प्राधान्य देण्यात आले आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन २०१२ ला वैयक्तिक शौचालये पायाभूत सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या पायाभूत सर्व्हेक्षण २०१२ मधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या ७१२२ कुटुंबांचा नव्याने समावेश झालेला आहे. त्यांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे.

यापैकी ८९६ कुटुंबियांनी शौचालय बांधण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, उर्वरित कुटुंबियांनी ही शौचालये जानेवारी, २०१९ पर्यंत बांधणे अवश्यक असून तशी सूचना मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर सचिव यांच्या आदेशानुसार विशेषत: या कुटुंबांनी दोन शोषखड्डयाचे शौचालय बांधणे अनिवार्य आहे.

सेप्टीक टँक आणि एक शोषखड्डा शौचालयाच्या तुलनेत दोन खड्डयाचे शौचालय अधिक फायदेशीर आहे.दरम्यान, एकीकडे निर्मल जिल्हा होण्यासाठी प्रयत्न केले जात असताना अजूनही ग्रामीण भागात शौचालयांबाबत पुरेशी जागृती झाली नसल्याने अनेकांनी अनुदान असतानाही शौचालय बांधण्याच्या कामाबाबत टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी