जिल्हा परिषदेचे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:30+5:302021-09-03T04:33:30+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’साठी जिल्ह्यातील ९ शिक्षकांसह विशेष पुरस्कारासाठी एका शिक्षकाच्या नावाची घाेषणा गुरूवारी ...

जिल्हा परिषदेचे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर
रत्नागिरी : जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’साठी जिल्ह्यातील ९ शिक्षकांसह विशेष पुरस्कारासाठी एका शिक्षकाच्या नावाची घाेषणा गुरूवारी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी हे पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारांमध्ये लांजा तालुक्याला दोन पुरस्कार मिळाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या २२ शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी १० शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये पदवीधर शिक्षक एकनाथ आत्माराम चांदे (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, शेडवई, ता. मंडणगड), उपशिक्षक महेश राजाराम कोकरे (जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळा, मौजे दापोली), राजेश रघुनाथ भागणे (जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, कर्जी कुणबी, ता. खेड), उपशिक्षिका शीतल सत्येंद्र राजे (जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, गोवळकोट मराठी, ता. चिपळूण), ममता मकरंद विचारे (शाळा अंजनवेल क्र. २ कातळवाडी, ता. गुहागर), पदवीधर शिक्षक नथुराम शंकर पाचकले (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबेड बु. क्र. २, ता. संगमेश्वर), विद्याधर लक्ष्मण कांबळे (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लाजूळ क्र. १, ता. रत्नागिरी), नानासाहेब आप्पा गोरड (जिल्हा परिषद आदर्श देवधे क्र. ३, मणचे, ता. लांजा), दीपक रामचंद्र धामापूरकर (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, सोलगाव क्र. २, राजापूर) यांचा समावेश आहे. तर विशेष पुरस्कारासाठी सुनील दत्ताराम भोसले (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, खानवली क्र. ३ केंद्र खानवली, बीट पुनस, ता. लांजा) यांच्या नावाची घाेषणा करण्यात आली आहे.
निवड समितीने या शिक्षकांची आदर्श पुरस्कारासाठी निवड केल्यानंतर ते अंतिम मंजुरीसाठी कोकण आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. त्यांच्या मंजुरीनंतरच अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी हे पुरस्कार जाहीर केले. या पुरस्काराचा कार्यक्रम लवकरच शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. या पुरस्कारांच्या घोषणेवेळी शिक्षण सभापती वैयक्तिक कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमाेडे, उपाध्यक्ष उदय बने, महेश म्हाप, सर्व सभापती उपस्थित होते.