शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात; चिपळुणात गांजा सेवन करणारे चौघे ताब्यात

By संदीप बांद्रे | Updated: October 25, 2023 18:54 IST

चिपळूण : शहर आणि परिसरात अमली पदार्थाचे खुलेआमपणे सेवन केले जात आहे. शहरातील विरेश्वर कॉलनी येथील नव्याने काम सुरू ...

चिपळूण : शहर आणि परिसरात अमली पदार्थाचे खुलेआमपणे सेवन केले जात आहे. शहरातील विरेश्वर कॉलनी येथील नव्याने काम सुरू असलेल्या एका इमारतीत ४ तरूणांना गांजाचे सेवन करताना पकडले. हे चारही तरूण झिंगलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी या चारही तरूणांना ताब्यात घेतले. गांजा सेवन केलेल्या तरूणाने शहरातील एका बॉडीबिल्डरचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. तर चिपळूण पोलिसांनी अमली पदार्थाचे रॅकेट उद्वस्थ न केल्यास पोलिस स्थानकावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार रमेश कदम यांनी दिला. शहरात सातत्याने अमली पदार्थाचा पुरवठा आणि त्याचे सेवन करणाऱ्या घटना घडत आहेत. काही महिन्यापुर्वी अमली पदार्थाचे सेवन केलेल्या तरूणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतरही शहरातील विविध भागात तरूणाई अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची चर्चा आहे. शहरातील विरेश्वर कॉलनी येथे एका गृहसंकुलाचे बांधकाम सुरू आहे. गेली दोन तीन महिने या इमारतीचे बांधकाम बंद आहे. याच इमारतीत काही तरूण येत असल्याची चर्चा होती. त्यानुसार काही लोकांनी बुधवारी सकाळपासूनच पाळत ठेवली होती. इमारतीच्या बाजूलाच दुचाकी पार्किग करून हे तरूण इमारतीत गेले. तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत टेबल लावून गांजाचे सेवन सुरू केले. त्यानंतर दबा धरून बसलेल्या लोकांनी या चारही तरूणांना ताब्यात घेतले. त्यावेळी हे तरूण नशेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल होताच त्यांना ताब्यात घेतले. या तरूणांना विचारणा करताना शहरातील एका बॉडीबिल्डर करून गांजा घेत असल्याचे सांगितले. या चार तरूणांपैकी एकजण कापरे येथील असून उर्वरीत तिघेजण शहरातीलच आहेत. कापरे येथील या तरूणास यापुर्वी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात ताब्यात घेतले होते. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले की, येथील तरूणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडली आहे. गांजासह अमली पदार्थ सहजरित्या उपलब्ध होत असल्याने त्याचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढती आहे. पोलिस यंत्रणेने याची पाळेमुळे खणून काढायला हवीत. गांजासह अमली पदार्थाचे पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. येत्या पाच दिवसात या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास पोलिस स्थानकावर सर्वपक्षीय मोर्चा काढला जाईल, असा इशारा दिला. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव संतोष नलावडे, माजी नगरसेवक राजेश कदम, श्रीनाथ खेडेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस