चिपळूण : आईशी किरकोळ भांडण झाल्याने शहरातील मार्कंडी येथील १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडकीस आली. याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.जहीर अन्वर शेख (रा. मार्कंडी, स्वामी मठ शेजारी, चिपळूण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत राजेश यशवंत शिंदे (रा. मार्कंडी, स्वामी मठ शेजारी, चिपळूण) यांनी फिर्याद आहे. राजेश शिंदे यांच्या घरालगतची खोली अनुप नावाच्या मुलाला भाड्याने दिली आहे. त्याचा जहीर शेख हा मित्र असून, तो नेहमी अनुपला खोलीवर भेटायला यायचा.सध्या अनुप हा आपल्या गावी गेला असून, खोलीची चावी त्याने जहीरकडे दिली होती. अशातच जहीरचे त्याच्या आईशी भांडण झाले आणि तो रविवारी रात्री ९ वाजता घरातून रागाने निघून आला होता. जहीर रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या आईने सकाळी शोधाशोध केली. त्यानंतर अनुपच्या खोलीत पाहणी केली असता जहीरने गळफास घेतलेल्या स्थितीत आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तत्काळ पोलीस स्थानकाला देण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.
धक्कादायक ! आईशी भांडण झाले म्हणून युवकाने संपवले आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:35 IST
Suicide, police, crimenews, ratnagiri आईशी किरकोळ भांडण झाल्याने शहरातील मार्कंडी येथील १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडकीस आली. याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
धक्कादायक ! आईशी भांडण झाले म्हणून युवकाने संपवले आयुष्य
ठळक मुद्देचिपळूण शहरातील घटना भांडण होताच घरातून रागाने गेला निघून